

कोल्हापूर : पुणे पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीमध्ये आपली उमेदवारी मागे घेऊन भाजप प्रणित महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव यांना प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक, छत्रपती शिवाजी शिक्षक पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन तथा शिक्षक संघाचे राज्य संपर्कप्रमुख एस. व्ही. पाटील (सडोली खालसा) यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यांच्या निर्णयाबद्दल राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी मंत्री पाटील यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना, महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांच्या विजयासाठी आणि मताधिक्य वाढवण्यासाठी सर्वांनी तळागाळातून प्रामाणिक प्रयत्न करावेत. या प्रसंगी भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य राहुल चिकोडे, पतसंस्थेचे पार्लमेंटरी बोर्ड, संचालक व सल्लागार याकूब ढोले, माणिक शिंदे, एम. डी. पाटील, रामचंद्र माने आणि सुनील ढवळे यांच्यासह अनेक मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.