मंद्रूप(सोलापूर), पुढारी वृत्तसेवा : सोलापूर जिल्हातील मंद्रूप येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्याने पोलीस ठाण्यात गाईच्या मासाची वाहतूक करण्याबाबत तक्रार दिली. तक्रारीनंतर शुक्रवारी ( दि.11) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास तेरामैल येथे जनावरांची अवैध वाहतूक करण्यार्या छोटा हत्ती वाहनाला पोलिसांनी अडवले. आरोपी सलमान उस्मान मुल्ला,(वय वर्षे 30),रा.संजय गांधी नगर झोपडपट्टी नं 2,विजापुर नाका,सोलापूर व त्यांच्या सोबत असलेला सलमान अयुब खान (वय वर्षे 23),राहणार चाँद तारा मस्जिद,विजापुर नाका,सोलापूर,वाहीद महम्मद हनीफ कुरेशी (वय वर्षे 45),राहणार बेगमपेठ,सोलापूर यांना ताब्यात घेतले.
पोलीसांनी सदर वाहनांच्या पाठीमागील हौदात पाहिले असता हौदामध्ये बर्फाचे लादी लावुन त्यावर गाईच्या मांसाचे तुकडे असल्याचे त्यांना दिसुन आले. सदर वाहन चालकाकडे अधिक चौकशी केली असता त्याने मालक जुनेद कुरेशी,रा.विजापुर नाका,सोलापुर यांचा असुन सोलापुर ते इंडी असे घेवुन जात असल्याचे सांगितले.
या कारवाईत 20 हजार रुपये किंमतीचे अंदाजे 100-120 किलो गाईच्या मांसाचे तुकडे, 3 लाख 15 हजार रुपये किंमतीचे छोटा हत्ती वाहन क्रमांक MH25AJ 4034 असा एकुण 3 लाख 35 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल मंद्रूप पोलीसांनी जप्त केले आहे.
बेकायदेशीर रित्या पाळीव जनावरांचे कत्तल करुन सदर मासांचे तुकड्यांमुळे सुटलेल्या दुर्गधीमुळे लोकांच्या जिवीतास धोका होण्यासारखे संसर्गजन्य रोगराई पसरण्याची शक्यता आहे. हे माहीत असताना देखील गाईचे जनावरांचे मास निष्काळजीपणे विक्री करीता घेवुन जात होते. आरोपी विरुद्ध मंद्रूप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
.हेही वाचा