Indian Railways: ‘रेल मदद’ अॅप प्रवाशांसाठी ठरतेय फायदेशीर | पुढारी

Indian Railways: ‘रेल मदद’ अॅप प्रवाशांसाठी ठरतेय फायदेशीर

सोलापूर: पुढारी वृत्तसेवा : रेल्वे प्रवाशांना तक्रार करण्यासाठी हेल्पलाइन, सोशल मीडिया असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. या तक्रारींचा पाठपुरावा करण्यासाठी रेल्वेने ‘रेल मदद’ अॅप सुरू केले आहे. रेल्वे सूचना प्रणाली केंद्राने (क्रिस) हे अॅप विकसित केले आहे. या अॅपवरून सोलापूर विभागाकडे मागील वर्षी आलेल्या तब्बल १०० टक्के तक्रारींचा निपटारा झाला आहे. ऑनलाइन तक्रार नोंदविण्यासह आपण नोंदवलेल्या तक्रारींचा पाठपुरावा शक्य असल्याने हे अॅप प्रवाशांसाठी फायदेशीर ठरत आहे. Indian Railways

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाबाबत १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या काळात ‘रेल मदद’ अॅपवर एकूण २४ हजार १५४ तक्रारी आल्या होत्या. यापैकी २४ हजार १५४ तक्रारींचा तातडीने निपटारा करण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. Indian Railways

प्रवासी तक्रारींमध्ये सर्वाधिक तक्रारी या एसी, स्लीपर क्लासमध्ये विना तिकीट, पाणी व मेडिकल असिस्टंटच्या सर्वाधिक तक्रारी होत्या. या तक्रारींसाठी निवारण्यासाठी सरासरी आठ मिनिटांचा वेळ लागत आहे. अनेकदा प्रवाशांनी केलेल्या तक्रारी या अन्य विभागीय रेल्वेशी संबंधित असल्याने त्यांना योग्य उत्तर देण्यास आणि त्या तातडीने सोडविण्यात रेल्वे प्रशासनाला विलंब होतो. प्रवाशांच्या तक्रारींना योग्य प्रतिसाद मिळावा, यासाठी यात आवश्यक बदल करून हे अॅप नुकतेच ‘अपडेट’ करण्यात आले आहे.

हेही वाचा 

Back to top button