Pistol Permission: ब्राह्मण समाजाने मागितली ‘पिस्तूल’ बाळगण्याची परवानगी; काय आहे कारण? | पुढारी

Pistol Permission: ब्राह्मण समाजाने मागितली 'पिस्तूल' बाळगण्याची परवानगी; काय आहे कारण?

सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा: काही समाजकंटकांकडून तीन मिनिटांत ब्राह्मण समाजाला संपविण्याची भाषा केली जात आहे. त्यामुळे ब्राह्मण समाजाची सुरक्षा धोक्यात आली आहे. ब्राह्मण समाजातील व्यक्तींना जातीवरून हिणवण्याचे प्रकार सुरू आहेत. अशा लोकांवर अनुसूचित जाती-जमाती -जमाती अधिनियमांतर्गत कायदेशीर कारवाई करावी तसेच ब्राह्मण समाजाच्या संरक्षणासाठी पिस्तूल परवाना द्यावा, अशी मागणी समाजाच्यावतीने करण्यात आली आहे. (Pistol Permission)

सोमवारी (दि. ४) यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना समस्त ब्राह्मण समाजाच्यावतीने निवेदन सादर करण्यात आले. यावेळी मोहन दाते, जयंत फडके, रामचंद्र तडवळकर, निशिकांत खेडकर, बजरंग कुलकर्णी, अमृता गोसावी, अभिजित देवधर, पांडुरंग देशपांडे, पुरुषोत्तम देशपांडे,अजित खजिनदार, चंद्रकांत कल्याणकर उपस्थित होते. (Pistol Permission)

Pistol Permission: ‘या’ आहेत ब्राह्मण समजाच्या मागण्या

ब्राह्मण समाजाला स्वसंरक्षणार्थ पिस्तुल परवाना द्यावा, ब्राह्मण समाजाविरुध्द विनाकारण जातीवाचक उद्‌गार काढणाऱ्यांना व जातीवरुन हिणवणाऱ्यांवर अनुसूचित जाती-जमाती कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी, ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या युवकांना स्वयंरोजगारासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी, विविध हिंदू धार्मिक स्थळांमध्ये पूजा विधी व मंत्र विधी करणाऱ्यास शासनाच्यावतीने मानधन द्यावे, ब्राह्मण समाजातील गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि आर्थिक मदत करावी अशा मागण्या सोलापूरमधील ब्राह्मण समाजाने जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

हेही वाचा:

Back to top button