सोलापूर : पुन्हा सेना-भाजप एकत्र येतील | पुढारी

सोलापूर : पुन्हा सेना-भाजप एकत्र येतील

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा

देशात शिवसेना, भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादीही जातीयवादी पक्ष आहेत. ते निव्वळ मतांचे राजकारण करीत जनतेला मोठमोठी आश्वासने देऊन फसवतात. त्याचआधारे भाजप केंद्रात, तर शिवसेना महाराष्ट्राच्या सत्तेत आली आहे. सत्तेसाठी भविष्यात सेना, भाजप एकत्र येतील, असा राजकीय अंदाज एएमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सोलापुरात व्यक्त केला.

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हुतात्मा स्मृती मंदिरात कार्यकर्ता मेळाव्याद्वारे त्यांनी रणशिंग फुंकले, त्यावेळी ते बोलत होते. दोघांनाही सत्तेवर येताच मुस्लिमांना देण्यात आलेल्या 5 टक्के आरक्षणाचा विसर पडला आहे, असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे येणार्‍या सर्वच निवडणुकांत त्यांना धडा शिकवू. महापालिका निवडणुकीतही मुस्लिमांनी सावध भूूमिका घ्यावी, असे आवाहन केले.

कायदे-जाती धर्मावर आधारित करू नयेत, तर ते वस्तुस्थितीवर आधारित करावेत. उत्तर प्रदेशात होणार्‍या निवडणुकीत एमआयएम पूर्ण ताकदीने उतरणार असून, त्या ठिकाणी पुन्हा भाजपची आणि योगी आदित्यनाथ यांचे सरकार येऊ नये यासाठी प्रयत्न असतील, असे त्यांनी जाहीर केले. ओवैसी म्हणाले, सध्या देशात मुस्लिमांना टार्गेट केले जात आहे.

त्रिपुरा येथे झालेल्या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी औरंगाबादमध्ये भाजप-सेनेच्या नेत्यांनी मोर्चा काढला. मात्र, त्या ठिकाणी मुस्लिमांना मोर्चा काढण्यासाठी बंदी घातली. त्यामुळे या देशात आता जातीयवाद सुरू झाल्याचे स्पष्ट होत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी सातत्याने एमआएम भाजपची बी टीम असल्याची टीका करतात

मात्र कट्टर हिंदुत्ववादी असलेल्या शिवसेनेसोबत या दोन्ही पक्षांनी आघाडी करून सत्ता मिळवली. तेव्हा त्यांची धर्मनिरपेक्षता कोठे गेली? काँग्रेस आणि राष्ट्रवादीने धर्मनिरपेक्षता (सेक्युलॅरिझम) जमिनीत गाडली? शरद पवार आणि राहुल गांधी यांनी सागावे की, मुस्लिमांच्या विरोधात सातत्याने भूमिका घेणारी शिवसेना सेक्युलॅरिझम कशी? धर्मनिरपेक्षतेच्या गप्पा मारून, मुस्लिमांची मत घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्तेत आले आहेत. सत्ता मिळेल की नाही, या भीतीपोटी त्यांनी

ओवैसी म्हणाले, महाराष्ट्रातील अनेक कारागृहांमध्ये दहा वर्षांपूर्वी 11 टक्के मुस्लिम कैदी होते. त्यामध्ये आता प्रचंड वाढ झाली असून सध्या ती संख्या जवळपास 32 टक्क्यांवर पोहोचली आहे. त्यामुळे गेल्या दहा वर्षांतील आकडेवारीच या सरकारने जाहीर केलेली नाही. त्यामुळे अनेक निष्पाप मुस्लिम तरुणांना डांबून ठेवले जात आहे.

Back to top button