सोलापूर : करमाळ्यात अंगावर विज पडुन १ ठार, २ शेळया १७ कोबंड्याचा मृत्‍यु | पुढारी

सोलापूर : करमाळ्यात अंगावर विज पडुन १ ठार, २ शेळया १७ कोबंड्याचा मृत्‍यु

करमाळा(सोलापूर), पुढारी वृत्‍तसेवा : गेल्या दोन- तीन महिन्याच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर शनिवारी सांयकाळी करमाळा शहर व तालुक्यात विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. यावेळी अंगावर विज पडुन एक वृध्द ठार झाला आहे तर झाड पडुन दोन बोकड व 17 कोबंड्याचाही यात मृत्‍यु झाला आहे.

याबाबत मिळालेल्‍या माहितीनुसार, अंबादास बाजीराव काळे (वय ६०) रा.मोरवड असे विज पडुन ठार झालेल्या वृध्दाचे नाव आहे. अंबादास हे शनिवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास मोरवड हद्दीतील विहाळ गावच्या नजीक फाॅरेस्ट जवळ जनावरे घेऊन शेतात चारायला गेले होते. यावेळी वादळी वारे व विजेच्या कडकडाटासह पाऊसाला सुरूवात झाली. यावेळी अचानक अंगावर विज पडून काळे यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेनंतर काळे यांच्या मृतदेहाचे करमाळा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. शनिवारी रात्री उशिरा अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत काळे यांच्या पश्चात एक मुलगी, दोन मुले, नातवंडे व पत्नी असा परिवार आहे.

तहसिल कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापनाने दिलेल्‍या माहितीनुसार, विज पडुन वृध्द ठार झालेल्या घटनेसह ग्रामीण भागात काही ठिकाणी विज व झाड पडून दोन बोकड व सुमारे सतरा कोबंड्याचाही मृत्यु झाला आहे. दरम्यान मोरवड येथे वीज कोसळून एका वृध्दाचा तर पोफळज येथे एक बोकड ठार झाले. हिवरवाडीत घरासमोरील झाड कोबंड्याच्या खुराड्यावर कोसळून एक बोकड व १७ कोंबड्या ठार झाल्या आहेत.

शनिवारी सायंकाळी शहर व तालुक्यातील ग्रामीण भागात प्रचंड उकाड्यानंतर करमाळा शहरासह, जेऊर, अंजनढोह, विहाळ, वीट, मोरवड, आळजापुर, बिटरगाव, पोथरे, रोशेवाडी आदी ठिकाणी पाऊस झाला आहे. अंबादास काळे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तालुक्यात अनेक ठिकाणी जनावरे व कोबंड्याचाही मृत्यू झाला आहे. याबाबत शासनाने तात्काळ पंचनाम्याची कारवाई करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मोरवड वि.का.सेवा सोसायटी, मोरवड यांनी केली आहे.

.हेही वाचा 

सोलापूर: जालना घटनेच्या निषेधार्थ रिधोरे येथे रास्ता रोको

हिंगोली : बाळापुरात सकल मराठा समाजाच्यावतीने दीड तास रास्ता रोको

जालनेच्या घटनेनंतर सांगोला सकल मराठा समाजाच्यावतीने रस्ता रोको आंदोलन

Back to top button