हिंगोली : बाळापुरात सकल मराठा समाजाच्यावतीने दीड तास रास्ता रोको | पुढारी

हिंगोली : बाळापुरात सकल मराठा समाजाच्यावतीने दीड तास रास्ता रोको

बाळापूर; पुढारी वृत्तसेवा जालना येथे मराठा बांधवावरील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आ. बाळापूर व परिसरातील सकल मराठा समाजाच्या वतीने आखाडा बाळापूर येथील नांदेड-हिंगोली महामार्गावर सकाळी दहा ते साडेअकरा वाजेपर्यंत दीड तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजुने वाहनाच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या.

जालना जिल्ह्यातील अंतरवरली सराटी येथे मराठा क्रांती मोर्चाच्या शांततेत सुरू असलेल्या आंदोलनावर भ्याड हल्ला करून हवेत गोळीबार करण्यात आला होता. याचा निषेध म्हणून आखाडा बाळापूर सकल मराठा समाजाच्या वतीने आज रविवार (दि.3) सप्टेंबर रोजी सकाळी नांदेड-हिंगोली महामार्गावर दीड तास रास्ता रोको करण्यात आला. यावेळी सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये मोठ्या घोषणा देण्यात आल्या.

वसमत येथील उपविभागीय अधिकारी संदिपान शेळके व बाळापूर येथील ठाणेदार सुनील गोपींनवार यांना मागण्यांची निवेदन देण्यात आले. यावेळी आ. बाळापूर, काडली, पिंपरी, देवजना, शेवाळा, घोडा, कामठा, चिखली, आडा, पावन मारी येथील सकल मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Back to top button