

तांदुळवाडी(सोलापूर), पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण केलेल्या सकल मराठा समाज अंतरवली सराठी जिल्हा जालना येथे मराठा समाजाच्या उपोषणकर्त्यावर केलेल्या लाठी चार्ज हल्ल्याच्या घटनेचा निषेध व्यक्त करत सकल मराठा समाजाच्यावतीने रिधोरे येथे रास्ता रोको केले.
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे, यासाठी शांततेच्या मार्गाने आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे सहकारी,लहान मुले, वृद्ध महिला अंतरवाली सराटी जिल्हा जालना येथे तेथील पोलीस प्रशासनाने अमानुषपणे लाठीचार्ज केला. या घटनेचे सर्व राज्यभर पडसाद उमटले. रिधोरे तालुका माढा येथे सकल मराठा समाजाच्यावतीने रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी सर्वपक्षीय मराठा समाज बांधव मोठया संख्येने सहभागी होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांची दोन-दोन किलोमीटर रंगा लागलेल्या होत्या.
मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यात यावे, सारथी योजनेच्या लाभार्थ्यांना शैक्षणिक अनुदान उपलब्ध करून देण्यात यावे. अण्णासाहेब पाटील महामंडळाला भरघोस प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात यावा आदी मागण्यांचे निवेदन महिलांच्या हस्ते मंडलाधिकारी व कुर्डूवाडी पोलीस स्टेशनचे अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी लहुजी शक्ती सेनेच्या पाठिंबाचेही निवेदन देण्यात आले.
.हेही वाचा