सोलापूरहून विमान सेवा लवकरात लवकर सुरू व्हावी; खासदार धनंजय महाडिक | पुढारी

सोलापूरहून विमान सेवा लवकरात लवकर सुरू व्हावी; खासदार धनंजय महाडिक

टाकळी सिंकदर; पुढारी वृत्तसेवा : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सोलापूरच्या विमानसेवेचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून प्रश्नोत्तराच्या तासाला लक्षवेधी प्रश्न उपस्थित करून खासदार धनंजय महाडिक यांनी शासनाचे लक्ष वेधले.

यावेळी महाडिक म्हणाले की, शहरांचा विकास होण्यासाठी रस्ते मार्ग, रेल्वे मार्ग याचबरोबर हवाई वाहतूक अत्यंत महत्त्वाची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छोटी शहरे मोठ्या शहरांना जोडली पाहिजे हे उद्दिष्ट ठेवून ‘उडे देश का नागरिक’ असे संबोधित करत उडान योजना लागू केली आहे.

प्रत्येक नागरिक देखील विमानाने प्रवास करेल असे स्वप्न पंतप्रधान मोदींचे असल्याचे सांगत महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हा हा मोठा आणि महत्त्वाचा जिल्हा आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये सूतगिरण्यांचे जाळे मोठ्या प्रमाणात आहे. याठिकाणी निर्मिती होणारे टॉवेल, चादर, नॅपकिन संपूर्ण जगामध्ये निर्यात केली जाते.

देशातील सर्वात मोठे साखर कारखानदारीचे जाळे सोलापूर जिल्ह्यातच आहे. शिवाय द्राक्ष,दाळिंबचे उत्पन्न मुबलक प्रमाणात घेतले जात आहे. ज्या शुगर फॅक्टरीच्या चिमणीच्या अडथळ्यामुळे ही विमानसेवा सुरू होत नव्हती ती आता सुटली आहे. त्यामुळे सोलापूरहून लवकरात लवकर विमान सेवा सुरू करावी अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी संसदेत केली.

हेही वाचा;

Back to top button