Maharashtra Politics News | बडव्यांवरुन राजकारण तापले, आता बडवे समाजाने दिला इशारा | पुढारी

Maharashtra Politics News | बडव्यांवरुन राजकारण तापले, आता बडवे समाजाने दिला इशारा

सोलापूर ; पुढारी वृत्‍तसेवा : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी बडवे आणि विठ्ठल यांचा उल्लेख करून सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केल्यामुळे या विषयाला तोंड फुटले. वारंवार होत असलेल्या बडवे समाजाच्या बदनामीनंतर आता या समाजानेही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करून, आम्हाला बदनाम का करता, असा सवाल उपस्थित केला आहे. (Maharashtra Politics News)

आम्ही कधीही आमच्या विठ्ठलाला सोडले नाही, त्याच्यासोबत गद्दारी केली नाही. मात्र, तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी विठ्ठलाला सोडून त्याला त्रास देणाऱ्या माणसांबरोबर गेला आहात, असा टोला बडवे समाजाचे श्रीकांत महाजन बडवे यांनी लगावला आहे.

शरद पवार आमचे विठ्ठल आहेत. मात्र आमच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरा घातला आहे. त्या बडव्यांमुळे आज आम्ही बाहेर पडलो. आम्ही भाजपत गेलेलो नाही. राज्यातील शेतकरी व सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच सत्तेत सहभागी झालो. ज्याप्रमाणे नागालँडमध्ये परवानगी दिली, तशी आम्हाला द्या, असे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले होते. त्यांनी त्यांच्या वक्तव्यात बडव्यांचा उल्लेख केल्यामुळे त्यावर बडवे समाजाने आक्षेप घेतला आहे.

हेही वाचा :  

Back to top button