World Chocolate Day : चॉकलेट खा..! पण नियम सांभाळून; वाचा डॉक्टर काय सांगता

World Chocolate Day : चॉकलेट खा..! पण नियम सांभाळून; वाचा डॉक्टर काय सांगता
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

चॉकलेटमुळे दात खराब होतात, वजन वाढते, असे कितीही गैरसमज असले, तरी चॉकलेट हा अनेकांचा जिव्हाळ्याचा विषय. त्यासाठी दि. ७ जुलै हा दिवस खास 'जागतिक चॉकलेट दिन' (World Chocolate Day)  म्हणून साजरा केला जाताे. व्हॅलेंटाइन विकमध्ये येणारा चॉकलेट डे आणि आज जागतिक चॉकलेट दिन असे वर्षातून दोनदा चॉकलेट दिन साजरे केले जातात. चॉकलेट व्यतिरिक्त चॉकलेटपासून असंख्य पदार्थ तयार केले जातात. चॉकलेट केक, ब्राउनी, मोदक, चॉकलेट इडली, चॉकलेट पाणीपुरी, पॉपकॉर्न, चिप्स यांसारखे पदार्थ चवीने चाखले जातात. युरोपमध्ये १५५० मध्ये पहिल्यांदा चॉकलेट दिन साजरा केला गेला. २००९ पासून भारतात चॉकलेट दिन साजरा केला जात आहे.

चॉकलेट चवीला जितके चांगले लागते, तितके आरोग्यासाठीही चांगले असते. चॉकलेटमधील नैसर्गिक घटकांमुळे मूड पटकन चांगला होतो. शरीरात आनंद निर्माण करणारे हार्मोन्स तयार होतात तसेच चॉकलेट खाल्ल्यानंतर मेंदूला चालना मिळते. चॉकलेटमुळे मेंदूमधील इंडॉरफिनच्या पातळीत वाढ होते, त्यामुळे मेंदूला तरतरी येते. डार्क चॉकलेट खाल्ल्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. चॉकलेट खावे की, खाऊ नये, अशा दोन बाजू आहेत. अभ्यासानुसार डार्क चॉकलेट खाण्याचे फायदे असले, तरी रक्तदाब, मधुमेह असलेल्यांनी वैद्यकीय सल्ल्यानुसार चॉकलेट खावे. शिवाय कोणतीही वस्तू खाताना त्याच्या पॅकेटवर पदार्थामध्ये किती कॅलरीज आणि कन्टेन्ट आहेत, त्याची माहिती दिलेली असते. कोणतेही चॉकलेट खाताना ती माहिती जरूर वाचावी.

शरीरातील ग्लुकोजची पातळी कमी झाली की, चक्कर, अशक्तपणा, भूक लागल्यासारखे होते. अशा परिस्थितीत अनेक लोक चॉकलेट खाण्यास प्राधान्य देतात, त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण चटकन वाढून माणसाला तरतरी येते. परंतु, हा तात्पुरत्या स्वरूपाचा उपचार असतो. अशा परिस्थितीत एखादे फळ किंवा चपातीचा रोल करून खावा. त्यामुळे शरीरातील साखर एकदम न वाढता हळूहळू वाढते.

चॉकलेट खाऊच नये असे नाही, तर चॉकलेट खाल्ल्यानंतर ब्रश करणे महत्त्वाचे असते. चॉकलेट खाल्ले आणि ब्रश केला नाही, तर दात किडतील असे नाही. जेवण केल्यानंतर ब्रश केला नाही, तरी दात किडतात.

– डॉ. सचिन दहिवेलकर, डेंटल ॲण्ड ओरल

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news