पुढारी ऑनलाईन : जागतिक बाजारातून नकारात्मक संकेतांमुळे देशांतर्गत बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टी आज शुक्रवारी (दि. ७) घसरले. सेन्सेक्स आज सुमारे २०० अंकांनी घसरून ६५,५५९ वर खुला झाला होता. काही वेळातच तो १०० अंकांच्या घसरणीसह ६५,६८२ वर आला. तर निफ्टी १९,४५८ वर व्यवहार करत आहे. सुरुवातीच्या व्यवहारात अशोल लेलँडचा शेअर सुमारे २ टक्क्यांनी घसरला. तर टायटनचा शेअर ३ टक्क्यांनी वाढला. (Stock Market Opening Bell)
सेन्सेक्स काल गुरुवारी ३३९ अंकांच्या वाढीसह ६५,७८५ वर बंद झाला होता. तर निफ्टी ९८ अंकांनी वाढून १९,४९७ वर स्थिरावला होता. या तेजीमुळे गुंतवणूकदार एका सत्रात सुमारे १.८ लाख कोटींनी श्रीमंत झाले.
सेन्सेक्सवर टेक महिंद्रा, इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक, एचसीएल टेक, भारती एअरटेल, कोटक बँक, बजाज फायनान्स हे शेअर्स घसरले. तर टायटन, टाटा स्टील, सन फार्मा, रिलायन्स, टाटा मोटर्स हे शेअर्स तेजीत आहेत. (Stock Market Opening Bell)
हे ही वाचा :