सोलापूर : ५४ लाख रुपयांच्या गुटख्यासह कंटेनर जप्त; सांगोला पोलिसांची कारवाई

सोलापूर : ५४ लाख रुपयांच्या गुटख्यासह कंटेनर जप्त; सांगोला पोलिसांची कारवाई
Published on
Updated on

सांगोला; पुढारी वृत्तसेवा : कर्नाटकातून औरंगाबादकडे जाणारा कंटेनर सांगोला पोलिसांनी पकडला. यामध्ये ५४ लाख चार हजार रुपये किमतीच्या गुटख्यासह कंटेनर आणि दोघांना सांगोला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की मंगळवार (दि.२७) रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास सांगोला-अकलूज रोडवर वंदे मातरम चौक येथे पोलीस नाईक नागेश निंबाळकर व सुखदेव गंगणे यांनी कंटेनर क्रमांक (एच. आर. ५५ ए . एल . ९४२५) ची तपासणी केली.

यामध्ये अवैद्य सुपारी व सुगंधी तंबाखूची ७० पोती आढळून आली. या गुटक्याची किंमत २९ लाख चार हजार रुपये व कंटेनरची किंमत २५ लाख रुपये असा एकूण ५४ लाख चार हजार रुपयांचा मुद्देमाल पकडण्यात आला. संशयित रिझवान महंमद आसिफ जामा (वय २६) व मोहम्मद गुफरान अब्दुल सत्तार (वय २०) यांना ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत सांगोला पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते.

हेही वाचा;

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news