भ्रष्टाचार करणाऱ्यांना मोदी सरकारचे अभय; दिग्विजयसिंह यांची टीका | पुढारी

भ्रष्टाचार करणाऱ्यांना मोदी सरकारचे अभय; दिग्विजयसिंह यांची टीका

माढा; पुढारी वृत्तसेवा: केंद्रात मोदी सरकार नऊ वर्षांपासून सत्तेत आहे. तरीही भ्रष्टाचाऱ्यांना ते पकडू शकलेले नाहीत. तरीही तेच भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. हे अपयश असून मोदी सरकार कुचकामी ठरले आहे, असा घणाघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंह यांनी केला. माढा येथे काँग्रेसचे माजी आमदार धनाजीराव साठे यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी ते म्हणाले की, भाजप भ्रष्टाचाराचे आरोप ज्यांच्यावर  करत आहे. त्यांनाच ते पक्षात घेतात. भाजपजवळ वॉशिंग मशीन आहे. भ्रष्टाचार करणाऱ्यांना मोदी सरकार नऊ वर्षांपासून पकडू शकलेले नाही. हेच मोदी सरकारचे अपयश आहे. बीआरएस संदर्भात बोलताना ते म्हणाले की पूर्वीच्या काळात आक्रमणे होत होती. पण महाराष्ट्राची भूमी ही शिवाजी महाराजांची भूमी आहे. येथे बीआरएसचे आक्रमण चालणार नाही.

यावेळी साठे परिवाराकडून दिग्विजयसिंह यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर त्यांनी माढ्यातील मूळ मुर्तीचा दावा असलेल्या विठ्ठलाचे दर्शन घेतले. माजी आ धनाजीराव साठे, दादासाहेब साठे, नगराध्यक्ष मिनल साठे, उपनगराध्यक्ष कल्पना जगदाळे, कुर्मदासचे व्हा. चेअरमन सुधीर पाटील, ॲड. बी. डी. पाटील आदी उपस्थित होते.

Back to top button