सोलापूर : निमगावात वादळी पावसाने काढणीस आलेली केळीची बाग भुईसपाट

केळीची बाग भुईसपाट
केळीची बाग भुईसपाट

निमगाव ; पुढारी वृत्तसेवा निमगाव चांदापुरी तरंगफळ ता. माळशिरस या परिसरात (रविवार) सायंकाळी जोरदार वादळी वारे सुटल्याने निमगाव व चांदापुरी केळी उत्पादक शेतकरी अमर मगर यांच्या शेतातील पाच एकर काढणी योग्य झालेली केळीची बाग वादळी वाऱ्यामुळे भुईसपाट झाली. यामध्ये लाखो रूपायांचे नुकसान झाले.

निर्यातक्षम केळी बाग लागवङीपासून कापनी पर्यंत आणण्यासाठी आधुनिक पध्दतीने रोप सेंद्रिय व रासायनिक खते यांचे नियोजन करावे लागते. खतांचे दर गगनाला भिडल्‍याने एक एकर केळी घेण्यासाठी दीङ ते दोन लाख रूपये खर्च होतात. तर केळीचे आजचे दर प्रति किलो दहा रूपये किलो आहेत. एकरी तीस टन केळी निघते. मगर यांचे पंधरा लाख रूपायांचे नुकसान झाले आहे.

हातातोंङाशी आलेला घास निसर्गाने एका फटक्यात हिरावुन नेला. केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला. नुकसानग्रत बागांची पाहणी करण्यासाठी कोणीही आधिकारी व लोकप्रतिनिधी आले नाहीत. सबंधीत शेतकऱ्यांच्या बागांची पाहणी करून पंचनामे करावेत. नुकसान भरपाई मिळावी आशी मागणी शेतकरयांनी केली आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news