Mansukh Hiren Murder Case : एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन | पुढारी

Mansukh Hiren Murder Case : एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : रिलायन्स उद्योगसमुहाचे मालक मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्यासमोर स्फोटके ठेवण्याबरोबरच उद्योगपती मनसुख हिरेन हत्या प्रकरणात गंभीर आरोप झालेले मुंबईचे माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी जामीन दिला. आजारी पत्नीची देखभाल करण्यासाठी जामीन दिला जावा, असे शर्मा यांनी याचिकेत म्हटले होते. त्यानुसार तीन आठवड्यांसाठी त्यांना न्यायालयाने जामीन दिला आहे.

‘इनकाउंटर स्पेशालिस्ट’ अशी ओळख असलेल्या माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांना एनआयएने अटक केली होती. अँटिलियासमोर बॉम्ब ठेवल्याच्या तसेच हिरेन हत्या प्रकरणात आपण निर्दोष आहोत, असा जबाब शर्मा यांनी न्यायालयासमोर दिला होता. मुंबई पोलिस दलात १९८३ साली उपनिरीक्षक म्हणून रुजू झालेले शर्मा हे तीनशेपेक्षा जास्त इनकाउंटरमध्ये सामील होते. यातील ११३ इनकाउंटर त्यांच्या नावावर आहेत.

हेही वाचा : 

Back to top button