सोलापूर : पारेवाडी रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाडीला थांबा मिळणार का? | पुढारी

सोलापूर : पारेवाडी रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाडीला थांबा मिळणार का?

केत्तूर (सोलापूर), पुढारी वृत्तसेवा : पारेवाडी येथे एक्स्पप्रेस गाडीला थांबा मिळावण्यासाठी नागरिक व प्रवासी संघटनांच्या वतीने एल्गार मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात शाळकरी मुले, टाळ मृदंग सहित वारकरी, असंख्य महिला व नागरिक उपस्थित होते. सदर मोर्चा हा रेल्वे प्रवासी संघटनेकडून आयोजित केला गेला होता.

याबाबत अधिक माहिती अशी, मोर्चाचे निवेदने ही डी आर एम सोलापूर यांना पाठून स्टेशन मास्तर यांनी स्विकारले होते. मोर्चा वेळी सर्व प्रवासी यांनी वर्गणी गोळा करून या मोर्चाचे आयोजन केले गेले होते. सण १९९७ साली अशाच प्रकारे रेल रोको करणेत आला होता. त्या वेळीही प्रवाशावर रेल्वे प्रशासनाने केस केल्या होत्या.

पारेवाडी रेल्वे स्थानकावर १५ गावाचा संपर्क येत असल्याने एक्सप्रेस गाडीला थांबा मिळणे फार गरजेच आहे. सदर थांब्या बाबत खासदार रणजितसिह निबाळकर यांनीही प्रवाशांना लवकरच थांबा देणे बाबत आश्वासन दिलेले होते. परंतु अद्याप थांबा मिळाला नाही. असे प्रवाश्यांनी माहिती दिली. तसेच एक्सप्रेस गाडयांना थांबा मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे.

पारेवाडी रेल्वे स्थानकावर जर येत्या २ महिन्यात एक्सप्रेस गाडी नाही. थांबली तर आम्ही सर्व प्रवासी संघटनेच्या माध्यमातुन पारेवाडी रेल्वे स्थानकावरच उपोषण धरणार आहे.
– उदय खाटमोडे-पाटील, सदस्‍य, प्रवासी संघटना 

.हेही वाचा 

आमचा निर्णय आम्हीच घेऊ, तिन्ही भाऊ एकत्र बसून ठरवू : छगन भुजबळ

सांगली जिल्ह्यात दिवसभरात तीन खून 

दै. ‘पुढारी’तर्फे आयोजित कार्यक्रम : गीतरामायण’ प्रवेशिकेसाठी रसिकांचा मोठा प्रतिसाद

Back to top button