दै. ‘पुढारी’तर्फे आयोजित कार्यक्रम : गीतरामायण’ प्रवेशिकेसाठी रसिकांचा मोठा प्रतिसाद | पुढारी

दै. ‘पुढारी’तर्फे आयोजित कार्यक्रम : गीतरामायण’ प्रवेशिकेसाठी रसिकांचा मोठा प्रतिसाद

बारामती(पुणे); पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राचे वाल्मीकी ग. दि. माडगूळकर विरचित आणि भावगंधर्व सुधीर फडके यांनी स्वरसाज चढविलेला ‘गीतरामायण’ हा बहारदार कार्यक्रम शनिवारी (दि. 27 मे) बारामतीत विद्या प्रतिष्ठानच्या ग. दि. मा. सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ संगीतकार आणि गायक श्रीधर फडके हा कार्यक्रम सादर करतील. या कार्यक्रमाच्या निःशुल्क प्रवेशिका वाटपास बुधवारी (दि. 24) सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी निःशुल्क प्रवेशिका घेण्यासाठी नागरिकांनी येथील दै. ‘पुढारी’ कार्यालयात मोठी गर्दी केली होती.

धूतपापेश्वरप्रस्तुत तसेच पॉवर्ड बाय श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर-बारामती आणि सहप्रायोजक लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि. व अक्कुडाज् दूधकांडी आणि दै. ‘पुढारी’ आयोजित हा कार्यक्रम शनिवारी सायंकाळी 6 वाजता पार पडत आहे. महाकाव्य असलेल्या रामचरित्रातील एकामागून एक अशा प्रसंगांवर उत्कृष्ट अशा रचना गदिमांनी केल्या आणि त्याला तितक्याच सुमधुर चाली सुधीर फडके यांनी रचल्या.

‘गीतरामायण’ शब्दमाळेतील 56 गीते मनाच्या विविध भावावस्थांनी ओथंबलेली आहेत. त्या ऐकण्यासाठी बारामतीसह इंदापूर, दौंड व अन्य तालुक्यांतील रसिकजन आतुर झाले आहेत. बुधवारी निःशुल्क प्रवेशिका वाटपाच्या पहिल्याच दिवशी रसिकांनी निःशुल्क प्रवेशिका घेण्यासाठी मोठी गर्दी केली.

दै. ‘पुढारी’ आयोजित हा कार्यक्रम आमच्यासाठी एक वेगळीच पर्वणी आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला आम्ही सहकुटुंब उपस्थित राहत असल्याचे रसिकांनी आवर्जून नमूद केले. या कार्यक्रमाला बारामतीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. येथील नगरपरिषदेसमोरील उद्योगभवन येथील दै. ‘पुढारी’ कार्यालयात सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत निःशुल्क प्रवेशिका उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी 8805007635 व 9850556009 या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  • स्थळ : ग. दि. मा. सभागृह, विद्या प्रतिष्ठान इन्स्टिट्यूटजवळ, भिगवण रोड, बारामती. शनिवार, दि. 27 मे 2023 रोजी सायंकाळी 6 वाजता.

Back to top button