सांगली : बेपत्ता बाळासाहेब माळी यांचा करकंब पोलिसांनी घेतला तात्काळ शोध

सांगली : बेपत्ता बाळासाहेब माळी यांचा करकंब पोलिसांनी घेतला तात्काळ शोध
Published on
Updated on

करकंब (सोलापूर); पुढारी वृत्तसेवा : भोसे येथील माजी जि. प. सदस्य व दत्तकृपा पेट्रोलपंपाचे मालक बाळासाहेब माळी दि. 15 रोजी रात्री 9 च्या सुमारास बेपत्ता झाले होते. यावेळी त्यांनी माझा शोध घेऊ नका असा संदेश सोशल मीडियावर व्हायरल करत त्यांचा साथीदार बंडू भुईरकर यांच्यासह बेपत्ता झाले होते.

बाळासाहेब माळी हे टेन्शनमध्ये असल्यामुळे त्यांचे मित्र भुईरकर त्यांची साथ सोडली नाही. माळी यांनी त्यांचा मोबाईल ही काढून घेतला होता व तू माझ्यासोबत येऊ नको असे वेळोवेळी म्हणत होते. परंतु त्यांचे सहकारी बंडू भुईरकर यांनी माळी यांची साथ न सोडल्यामुळे पुढील होणारा अनर्थ टळला.

मागील दोन दिवसांपासून माळी व भोईर कर यांचे मोबाईल बंद असल्यामुळे त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकत नव्हता. त्यांच्या पत्नी सुरेखा बाळासाहेब माळी यांनी करकंब पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. दोन दिवस करकंब पोलीस व नातेवाईक यांनी त्यांचा कसून तपास केला. परंतु, त्यांना यश मिळत नव्हते.

अखेर बुधवारी (दि.17) दुपारी 11 च्या सुमारास भुईरकर यांनी त्यांच्या मोबाईल वरून सज्जन भोसले, पंढरेवाडी यांना गोंदवले येथे असल्याचे सांगितले. त्यानंतर भोसले यांनी बाळासाहेब माळी यांचे चुलत बंधू रामदास माळी यांना सोबत घेऊन तात्काळ गोंदवले गाठले. करकंब पोलिसांची मोबाईल लोकेशन तपासणी सुरू असल्याने त्यांना ही गोंदवले लोकेशन आढळून आले.

त्यामुळे करकंब पोलीस स्टेशनचे सपोनि यांचे पथकही तेथे पोहचले होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांना वैद्यकीय तपासणी करून बाळासाहेब माळी व बंडू बुईरकर यांना रात्री 8 च्या सुमारास करकंब पोलिसांत घेऊन आले.

ही कामगिरी पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे व अप्पर पोलीस अधिक्षक हिंमत जाधव तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग विक्रम कदम यांचे मार्गदर्शनखाली सपोनि निलेश तारू, पोहवा घोळवे, आर. आर. जाधव, सागर भोसले, पोना संतोष पाटेकर, अभिजीत कांबळे तसेच सायबर पोलीस ठाणेकडील पोकों अन्वर आत्तार यांनी कामगीरी केली आहे.

हेही वाचा;

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news