सोलापूर : करमाळा तालुक्यात लालपरीतून ९८ हजार महिलांचा प्रवास | पुढारी

सोलापूर : करमाळा तालुक्यात लालपरीतून ९८ हजार महिलांचा प्रवास

जेऊर; पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही दिवसांपूर्वी राज्य शासनाने महिला सन्मान योजनेंतर्गत महिलांना बस तिकिटात पन्नास टक्के आरक्षण दिले आहे. याचा महिलावर्ग पुरेपूर फायदा घेत असल्याचे दिसून येत आहे. करमाळा राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून २४ दिवसांत तब्बल ९८ हजार ८८६ महिलांनी प्रवास केला आहे. यातून महामंडळाला ३१ लाख ४१ हजार ८६१ रुपये उत्पन्न मिळाले आहे.

राज्य शासनाने सुरू केलेल्या महिला सन्मान योजनेंतर्गत दररोज सरासरी ४५०० महिला प्रवास करत आहेत. तसेच वृद्धांचा देखील यामध्ये मोठा समावेश पाहायला मिळत आहे. या योजनेचे महिला वर्गाकडून कौतुक होत असून ही योजना कायम स्वरुपी चालू ठेवावी, अशी मागणीही महिला वर्गातून केली जात आहे.

महिला सन्मान योजनेला करमाळा आगारात उदंड प्रतिसाद लाभलेला आहे. दररोज सरासरी चार ते पाच हजार महिलांनी प्रवास केलेला आहे. करमाळा राज्य परिवहन महामंडळ विश्वासास पात्र राहण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहील. तसेच यापुढेही महिला सन्मान योजनेचा सर्व महिलांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा.
– अश्विनी किरगत (आगार व्यवस्थापक, करमाळा)

          हेही वाचलंत का ? 

 

 

Back to top button