सोलापुरात बुधवारी 'रमजान'चे चंद्रदर्शन नाहीच; शुक्रवार पासून रोजे होणार प्रारंभ | पुढारी

सोलापुरात बुधवारी 'रमजान'चे चंद्रदर्शन नाहीच; शुक्रवार पासून रोजे होणार प्रारंभ

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : सोलापूर शहर, जिल्ह्यात बुधवारी सायंकाळच्या सुमारास कोठेही चंद्रदर्शन झाले नाही. त्यामुळे शुक्रवारी (दि. 24) मार्चपासून पहिला रोजा होईल व रमजानच्या पवित्र महिन्यात सुरुवात होईल, अशी माहिती शहर काझी रुयते हिलाल कमिटीचे सय्यद अहमदअली निजामी यांनी दिली.

इस्लाम धर्माचा पवित्र महिना म्हणून रमजानचा महिना ओळखला जातो. कोरोनामुळे मागील दोन वर्षे रमजान सण मोठ्या उत्साहात साजरा करता आले नाही. दरम्यान, आता कोरोनाची परिस्थिती कमी झाली आहे. बुधवारी सायंकाळच्या सुमारास सर्वत्र मुस्लिम बांधवांनी चंद्र पाहण्याचा प्रयत्न केला. मात्र कुठेही चंद्रदर्शन झाले नाही. त्यामुळे 24 मार्च रोजी पहिला रोजा होईल, असेही शहर काझी मुफ्ती सय्यद अमजद अली, मौलाना ताहेर बेग, मौलाना फौजदार खान, मुफ्ती अब्दुल हमीद शेख, काझी अब्दुर राफे यांनी आवाहन केले.

अधिक वाचा :

Back to top button