पंढरपूर : विठ्ठल मंदिरात आजपासून तुळशी पूजा; उद्यापासून चंदनउटी पूजा | पुढारी

पंढरपूर : विठ्ठल मंदिरात आजपासून तुळशी पूजा; उद्यापासून चंदनउटी पूजा

पंढरपूर; पुढारी वृत्तसेवा : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असून तापमानाचा पारा वाढत आहे. उष्म्याचा श्री विठ्ठलास दाह जाणवू नये म्हणून परंपरेप्रमाणे चंदनउटी पूजा करण्यात येते. उटी पूजा चैत्र शुद्ध द्वितीयापासून म्हणजेच दि. 23 मार्चपासून करण्यात येणार आहे. ही चंदनउटी पूजा 6 जूनपर्यंत म्हणजेच मृग नक्षत्रापर्यंत चालणार आहे. यासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने तयारी पूर्ण केली आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तुळशीपूजेला सुरुवात करण्यात येत आहे.

3 मार्चपासून अर्ज स्वीकारण्यात आले होते. मात्र पहिल्याच दिवशी सर्वच चंदनउटी पूजा बुकिंग पूर्ण झालेे आहे. पुढील तीन महिने तीव्र उन्हाळ्याचा काळ असल्याने विठुरायाला या उष्म्यापासून दिलासा मिळावा म्हणून शीतल अशा चंदनाचा लेप संपूर्ण अंगाला लावण्यात येतो. यासाठी खास उच्च दर्जाच्या चंदनाचा वापर करण्यात येतो. यंदा 23 मार्च ते 6 जून या कालावधीत चंदनउटी पूजा करण्यात येणार आहे. यासाठी दि. 3 मार्चपासून भाविकांकडून ऑनलाईन व पोस्टाने अर्ज अर्ज मागविण्यात आल्याचे मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितले.

अधिक वाचा :

Back to top button