Earthquake in Delhi-NCR : भूकंपाने दिल्ली हादरली; तीव्रता ६.६ रिश्टर स्केल

Earthquake in Delhi-NCR : भूकंपाने दिल्ली हादरली; तीव्रता ६.६ रिश्टर स्केल

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : राजधानी दिल्लीसह एनसीआर, गाझियाबाद आणि चंदीगडच्या काही भागांत मंगळवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास भूकंपाचे धक्के बसले. हे धक्के सुमारे तीस सेकंदांपर्यंत जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानमधील फैजाबाद शहरात असल्याचे सांगण्यात आले. भूकंपमापन यंत्रावर त्याची तीव्रता 6.6 रिश्टर स्केल नोंदली गेली. (Earthquake in Delhi-NCR)

दिल्लीखेरीज गाझियाबाद परिसरातही हे धक्के जाणवले. त्यामुळे लोक घराबाहेर सैरावैरा धावत सुटले. काही ठिकाणी या भूकंपामुळे घरांना तडे गेल्याचे वृत्त आहे. सुदैवाने कोणतीही मोठी हानी अथवा जीवितहानी झालेली नाही, असे प्राथमिक वृत्तात म्हटले आहे. (Earthquake in Delhi-NCR)

या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानच्या फैजाबाद शहरात असल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे, या धक्क्यांनंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये दूरदळणवळण सेवा काही काळ खंडित झाली होती. पाकिस्तानातील इस्लामाबाद, लाहोर आणि पेशावर शहरांतही काही काळ भूकंपाचे धक्के जाणवल्याचे वृत्त आहे.


अधिक वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news