सोलापूर : मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकपदी नरेश लालवानी

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापक पदाचा नरेश लालवानी यांनी पदभार स्वीकारला. ते भारतीय रेल्वे अभियांत्रिकी सेवेतील 1985 च्या बॅचचे वरिष्ठ अधिकारी आहेत. यापूर्वी ते पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक आणि मुख्य दक्षता अधिकारी म्हणून कार्यरत होते.
लालवानी यांना भारतीय रेल्वेमध्ये विविध महत्त्वाच्या पदांवर काम करण्याचा समृद्ध अनुभव आहे. आसाममधील लुमडिंग येथून कारकिर्दीची सुरुवात करून त्यांनी 10 वर्षे ईशान्य फ्रंटियर रेल्वेमध्ये काम केले. त्यानंतर पश्चिम रेल्वेत अहमदाबाद आणि मुंबई विभागात विविध पदांवर काम केले. लालवानी यांनी भारतीय रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग, पुणे येथे प्राध्यापक म्हणूनही काम केले आहे. ते करार-लवाद, सुरक्षा आणि व्यवस्थापन विकास या क्षेत्रातील तज्ञ आहेत. त्यांनी मध्य रेल्वेत मुख्य अभियंता (ट्रॅक मशिन्स), दक्षिण रेल्वेतील पलक्कड विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक म्हणूनही काम केले आहे. तसेच त्यांनी चीन आणि फ्रान्समध्ये व्यवस्थापन प्रशिक्षण, ऑस्ट्रिया आणि इटलीमध्ये ट्रॅक मशीन प्रशिक्षण, अमेरिकेत नेतृत्व प्रशिक्षण आणि ऑस्ट्रियामध्ये दक्षता प्रशिक्षण घेतले आहे.
हेही वाचा :
- Share Market Crash | सेन्सेक्स ७७३ अंकांनी घसरला, बाजारातून ३.५ लाख कोटी उडाले, एका रिपोर्टमुळे अदानींच्या शेअर्सचे काय झाले पाहा?
- BBC Documentary : पंतप्रधान मोदींवरील वादग्रस्त लघुपट दाखविण्याचा प्रयत्न करणारे जामियामधले चौघे पोलिसांच्या ताब्यात
- Gautam Adani | गौतम अदानींचे एका दिवसात ६ अब्ज डॉलर उडाले, शेअर्स धडाधड कोसळल्याने संपत्तीत घट