

दत्तवाड (कोल्हापूर), पुढारी वृत्तसेवा : दत्तवाड तालुका शिरोळ येथील श्री. रेणुका देवी यात्रेनिमित्त कुस्ती मैदानात क्रमांक एकच्या कुस्तीत कोल्हापुरातील शाहूपूरी येथील पै. मनोज गावडे यांनी कोल्हापूरातील मोतीबागचा पै. कुमार पाटील यांचा पराभव केला. दीर्घकाळापर्यंत रंगलेल्या या कुस्तीत अखेर कमिटीच्या निर्णयानुसार दोघांमध्ये पॉईंटवर कुस्ती खेळण्यात आली. यामध्ये पै. मनोज गावडे यांनी बाजी मारली.
दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत व्यंकोबा मैदान इचलकरंजी येथील पै.अमित भोसले व हांडे पाटील तालीमचा पै. पृथ्वीराज पवार या दोघांमधील लढत बरोबरीत सोडवण्यात आली. तर क्रमांक तीनच्या कुस्तीत मोतीबाग कोल्हापूरच्या पै. इंद्रजीत मगदूम यांनी घोडगिरी तालमीचा पै. दयानंद घटप्रभा यांचा पराभव केला. याचबरोबर या कुस्ती मैदानात अनेक लहान मुलांच्या कुस्त्याही रंगल्या होत्या.
विजय पैलवानला कुरुंदवाड पोलीस निरीक्षक व सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. सदर कुस्ती पाहण्यासाठी दत्तवाडसह परिसरातील मोठ्या संख्येने कुस्तीप्रेमींनी गर्दी केली होती.
.हेही वाचा