भाजप सरकारकडूनच भाजप नेत्यांना, सहकारी पक्षांना संपवण्याचा डाव : सुषमा अंधारेंचा आरोप

सुषमा अंधारे यांची सभा
सुषमा अंधारे यांची सभा
Published on
Updated on

सांगोला (सोलापूर), पुढारी वृत्तसेवा : देशातील व राज्यातील भाजप सरकारकडून भाजप नेत्यांना व सहकारी पक्षांना संपवण्याचा डाव रचला आहे. आता एकनाथ शिंदे गटाला संपविण्याचे कटकारस्थान भाजपकडून सुरू आहे. या गटातील काही आमदार फुटले तर भाजपमध्ये जाणारे  पहिले आमदार शहाजी बापू पाटील असतील, असा आरोप  शिवसेना ठाकरे गटाच्‍या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांनी केला. सांगोला येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेवेळी त्‍या बोलत होत्‍या.

या वेळी अंधारे म्हणाल्या, मागील अनेक वर्षांपूर्वीचे व्हिडीओ कठछाट करून माझ्यावर आरोप केले जात आहेत. यावरून लाव रे दादा तो व्हिडिओ असे सांगून, एक ना अनेक पुरावे सादर करत स्वतःवर झालेल्या आरोपावरून नकली भोंदूबूवावर निशाणा साधला.  आत्तापर्यंत भाजपचे पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील यांना संपवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी व्यहरचना केली आहे.  जे पक्ष भाजसोबत आत्तापर्यंत होते त्यामधील शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांना वेगळे केले. सदाभाऊ खोत आता सध्या कुठे आहेत हे कोणी ठोसपणे सांगत नाही तर एकनाथ खडसे यांना गारद केले, असा आरोपही त्‍यांनी केला.

३३ मतदारसंघात सभा झाल्याने भाजप बेचैन

भाजप सरकार हे ३३ मतदारसंघात माझ्या सभा झाल्याने बेचैन झाले आहे. मला गुन्ह्यात अडकवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत असे सांगत त्‍यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांच्यावर देखील निशाणा साधला. आमदार शहाजीबापू पाटील यांचा १० जानेवारी २०२२ चा व्हिडिओ व्हायरल करत, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे जानेवारीमध्ये हिंदुत्ववादी होते. आता काय हॉटेल, काय झाडी, काय डोंगर एवढ्यावरून हिंदुत्ववादी दिसून येत नाहीत का, असा सवाल त्‍यांनी केला. पत्नीला साडी घेण्यासाठी पैसे नाहीत, असे म्हणणारे दोन एकराच्या भूभागावर सुसज्ज असा बंगला कोणत्या पैशातून बांधतात याचा जाब तालुक्यातील जनतेला द्यावा, असे आव्‍हानही त्‍यांनी दिले.

तरुणांच्या हाताला काम नाही

महाराष्ट्रातील उद्योग गुजरातकडे महाराष्ट्रातील गावे कर्नाटकमध्ये व तरुणांच्या हाताला काम नाही. यामुळे तरुणांना भडकवण्याचे काम सध्या भाजप सरकार करत आहे.  ८३ कोटीची मालमत्ता दोन कोटीमध्ये विकल्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाबत भाजपच्या आमदारांनी प्रश्न उपस्थित केला आहे. यामुळे भाजप हा पक्षामधीत मधील डोईजड होणाऱ्या नेत्याबरोबरसोबत असणाऱ्या पक्षातील कार्यकर्त्यांना संपवण्याचा प्रयत्न करत आहे, आरोपही सुषमाताई अंधारे यांनी केला .

आमचे पुरुष पट्टेदार वाघ अजून मैदानात उतरणे बाकी आहेत

सध्या महाराष्ट्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेची महिलांनी धुरा हाती घेतली आहे. तरीही आमचे विरोधक घाबरले आहेत; पण आमचे पुरुष पट्टेदार वाघ अजून मैदानात उतरणे बाकी आहे, असेही अंधारे म्‍हणाल्‍या.

शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांची हजेरी 

सुषमाताई अंधारे यांच्या सभेला शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. अनेक शेकापचे पदाधिकारी कार्यकर्ते सभा परिसरातील विविध दुकानांमध्ये विचार ऐकण्यासाठी ठिय्या मांडून बसले होते . यावेळी आमदार शहाजी बापू पाटील यांच्यावर होणाऱ्या टीकेवेळी शेकापच्या कार्यकर्त्यांनी शिट्या व टाळ्या वाजवल्या.

हेही वाचा  :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news