सोलापूर: कर्नाटकमधील वाहन चालकास सत्कार करून पाठवले | पुढारी

सोलापूर: कर्नाटकमधील वाहन चालकास सत्कार करून पाठवले

मोहोळ (सोलापूर), वृत्‍तसेवा :  छत्रपती शिवाजी महाराज चौक मोहोळ येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रुपेश धोत्रे व पदाधिकाऱ्यांनी कर्नाटक येथील वाहन चालकाचा सत्कार करून त्याला  सन्मानाने पाठवण्यात आले. “कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातील वाहन चालक व जनतेला वेठीस धरत असतील तर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास विसरलो नाही,” असे धोत्रे म्हणाले.

कन्नड रक्षण वेदिके’कडून बेळगावमध्‍ये महाराष्‍ट्रातील वाहनांची तोडफोड करण्‍यात आली होती.  मोहोळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी कर्नाटक येथील वाहन चालकांना थांबवले.  फेटा बांधून त्याचा सत्कार केला.

महाराष्‍ट्रातील वाहन चालकांवरील हल्‍ले त्वरित थांबवा. तुम्ही वादग्रस्‍त विधाने करून महाराष्ट्राच्या वाहन चालक तसेच महाराष्ट्राच्या जनतेला  वेठीस धरत असाल तर आम्ही सडेतोड उत्तर देण्याला मागेपुढे पाहणार नाही, असा इशाराही त्‍यांनी या वे‍ळी दिला.

हेही वाचा  

Back to top button