बेळगाव : कणबर्गीत पाईपच्या साठ्याला आग; गावातील वीजपुरवठा खंडित | पुढारी

बेळगाव : कणबर्गीत पाईपच्या साठ्याला आग; गावातील वीजपुरवठा खंडित

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा कणबर्गी ज्योतिर्लिंग गल्ली येथे एल अँड टी कंपनीने पाणीपुरवठ्यासाठी लागणाऱ्या पाईपचा साठा करून ठेवला होता. या पाईपच्या साठ्याला काल (बुधवार) रात्री आग लागल्याची घटना घडली. सदर आग आटोक्यात आणण्यासाठी स्थानिक नागरिकांनी अधिक परिश्रम घेतले.

बुधवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास ज्योतिर्लिंग गल्ली कणबर्गी येथे एल अँड टी कंपनीने ठेवलेल्या पाईपला आग लागल्याची घटना घडली. स्थानिक नागरिकांनी अग्निशामक दलाला या घटनेची माहिती दिली. तत्पूर्वी माजी नगरसेवक भैरगौडा पाटील, समाजसेवक अरुण मुचंडीकर व गल्लीतील नागरिकांनी आग विझवण्यासाठी परिश्रम घेतले. यावेळी त्‍यांनी 15 हून अधिक पाईप्स बाजूला केल्‍या. घटनास्थळी 30 ते 40 पाईप भस्मसात झाल्या.

आगीचा भडका इतका भयंकर होता की, या गावांमध्ये वीज पुरवठ्या करणाऱ्या वीज तारा वितळून गेल्या. त्यामुळे गावातील वीज पुरवठा देखील खंडित झाला. आग आटोक्यात आणल्यानंतर अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. आग लागल्याचे नेमके कारण समजले नाही. माळ मारुती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा : 

Back to top button