इंग्लंडमध्ये ‘स्वाभिमानी’ स्टाईल आंदोलन; दूध फेकून व्यक्त होत आहे रोष – ‘हे’ आहे कारण! Anti Dairy Protest in UK | पुढारी

इंग्लंडमध्ये 'स्वाभिमानी' स्टाईल आंदोलन; दूध फेकून व्यक्त होत आहे रोष - 'हे' आहे कारण! Anti Dairy Protest in UK

इंग्लंडमध्ये 'स्वाभिमानी' स्टाईल आंदोलन; दूध फेकून व्यक्त होत आहे रोष - 'हे' आहे कारण!

पुढारी ऑनलाईन – युनायटेड किंगडमध्ये विविध मॉल्स आणि स्टोअरमध्ये दूध फेकून रोष व्यक्त केला जात आहे. प्राणीजन्य पदार्थांना विरोध करण्यासाठी अॅनिमल रिबेलियन ग्रुपच्या वतीने हे आंदोलन केले जात आहे. याशिवाय बीफ विक्रीच्या दुकानांसमोर निषेधाची फलक लावले जात आहे. (Anti Dairy Protest in UK)

या संघटनेने बुधवारी लंडनमध्ये रस्त्यांवर दूध ओतून आंदोलन केले. तर काही दिवसांपूर्वी मँचेस्टर, नॉरविक, लंडन, इडेनब्रा या शहरांत वेटरोज, मार्कस अँड स्पेंसर, होल फूडस अशा मोठ्या स्टोअरमध्ये ही आंदोलनं झाली. युनायटेड किंगडमने वनस्पतीजन्य खाद्यपदार्थांचा पुरस्कार करावा, अशी या संघटनेची मागणी आहे.

अॅनिमल रिबेलियन ग्रुप म्हटले आहे, “वनस्पतीजन्य पदार्थांचा पुरस्कार केला तर अब्जावधी प्राण्यांवर होत असलेले अत्याचार थांबतील. प्राणीजन्य खाद्यपदार्थ हवामान बदलाचे मोठे कारण आहे, हेही लक्षात घेतले पाहिजे. प्राणीजन्य खाद्यपदार्थांसाठी प्राणी पाळले जातात, त्यांना खाद्य देता यावेत म्हणून कुरणं उभी करावी लागतात या सर्व जागा वन्यजीवांसाठी ठेवल्या पाहिजेत.”

दूध फेकून देण्याच्या या संघटनेच्या कृतीवर अनेकांनी टीकाही केली आहे.

हेही वाचा

Back to top button