Solapur News: अक्कलकोट रोडवरील टेक्सटाईल कारखान्यात आग, ३ कामगारांचा मृत्यू

Solapur News: अक्कलकोट रोडवरील टेक्सटाईल कारखान्यात आग, ३ कामगारांचा मृत्यू

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा: सोलापूर- अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील एका टेक्स्टाईल कारखान्याला आग लागल्याने तिघांचा दुर्दैवी मृत्यू (Solapur News) झाला. ही घटना आज (दि.५) सकाळी सहाच्या सुमारास घडली. रुपम विविंग मिल असे या कारखान्याचे नाव आहे. प्राथमिक अंदाजानुसार गॅसवर स्वयंपाक करत असताना आगीचा भडका उडून ही आग लागल्याचा अंदाज अग्निशमन दलाने व्यक्त केला आहे.

मनोज लक्ष्मीधर देहुरी, (वय 20, रा. ओडिसा), आनंद लक्ष्मीनारायण बगदी (वय 30, रा. पश्चिम बंगाल) सहदेव बुद्धवार बगद (वय 22, रा. पश्चिम बंगाल) असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तिघा परप्रांतीय कामगारांची नावे आहेत. रुपम विविंग मिल या कारखान्याच्या तळमजल्यावरती मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे. तर पहिल्या मजल्यावर कामगारांची राहण्याची सोय करण्यात आली होती. या ठिकाणी कामगारांनी आपल्या स्वयंपाकासाठी गॅस शेगडी, इलेक्ट्रिक शेगडी ठेवली होती. याच मजल्यावर पॅकेजिंगसाठी लागणारे रिकामे पुठ्ठे देखील ठेवण्यात (Solapur News)  आले होते.

बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास कामगारांपैकी एकाने स्वयंपाक करण्यासाठी गॅस पेटवला. याच वेळेस अचानक आग लागली. या कामगाराने तिथे असलेल्या पुट्टे आणि टॉवेलच्या साहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीने अधिकच भडका घेतल्याने त्याने तिथून पळ काढला. मात्र, यावेळी शेजारी असलेले एका खोलीत तीन कामगार झोपलेले होते. आगीने अचानक रौद्ररूप धारण केल्याने या तिघांना तिथून निघणे शक्य झाले नाही. त्यामुळे या तिघाही कामगारांचा श्वास गुदमरून मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येते आहे.

या घटनेची माहिती मिळताच सोलापूर महानगरपालिका अग्निशमन दलाचे अधिकारी आणि जवान अवघ्या काही मिनिटांतच घटनास्थळी दाखल झाले. मागील आठवड्यात देखील याच कारखान्यात आगीची घटना घडली होती. त्यावेळी अग्निशमन दलाने तत्काळ आग आटोक्यात आणली होती. ही आग विझवण्यासाठी जवळपास 10 पाण्याच्या बंबांचा वापर करण्यात आला.

ज्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे तिथे कायम धोका असतो. अशा ठिकाणी कामगारांची राहण्याची सोय करण्यात येऊ नये. या कारखान्यांमध्ये राहण्याची सोय करण्यात आली असून त्याच ठिकाणी गॅसची देखील व्यवस्था होती. घटना घडली तेव्हा एकही खिडकी उघडी नव्हती. त्यामुळे आग मोठ्या प्रमाणात वाढली, अशी प्रतिक्रिया सोलापूर अग्निशमन दलाचे प्रमुख केदारनाथ आवटे यांनी दिली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news