मेटे यांच्या वाहन चालकाचे कॉल रेकॉर्ड तपासा; भाचा बाळासाहेब चव्हाण यांची मागणी | पुढारी

मेटे यांच्या वाहन चालकाचे कॉल रेकॉर्ड तपासा; भाचा बाळासाहेब चव्हाण यांची मागणी

पुणे, पुढारी वृत्तसेवा : शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा अपघात होता की घातपात याची निःपक्ष चौकशी झाली पाहिजे. त्याचबरोबर मेटे यांचे वाहनचालक एकनाथ कदम यांच्या दोन महिन्यांचे कॉल रेकॉर्ड तपासावेत, अशी मागणी स्व. विनायक मेटे यांचे भाचे आणि शिवसंग्राम संघटनेचे पुणे शहर उपाध्यक्ष बाळासाहेब चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली.

चंद्रपूर : ब्रम्हपुरीत एकाच दिवशी दोन ठिकाणी वाघाचा हल्ला; एक ठार तर एक जखमी

यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले, सकाळी साडेपाच वाजता पक्षाचे प्रवक्‍ते तुषार काकडे यांचा अपघात झाला असल्याचा फोन आला. मेटे यांच्याकडे तीन वाहन चालक असल्याने त्यातील कोण वाहनचालक आहे याची माहिती काढून कदम याला फोन केला. कदम याने फोन उचलताच साहेब बोलत आहेत पण तुम्ही अपघातस्थळी या एवढेच बोलत होता. त्याला ठिकाणाचे नाव सांग अथवा लोकेशन पाठव असे वारंवार सांगितले. परंतु, त्याने ते केले नाही.

औरंगाबाद : तुकडे करून प्रेयसीचा खून; कारमधून शिर, पाय घेऊन जाताना प्रियकराला पकडले

या अपघातामध्ये एकनाथ कदम याला काहीही झालेले नाही. त्यामुळे या अपघाताबाबत एकनाथ याच्यावर अधिक संशय बळावत असून त्याचे गेल्या दोन महिन्याचे कॉल रेकार्ड, त्या परिसरातील सीसीटिव्ही तपासण्यात यावेत. त्याचबरेाबर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी नेमलेल्या आठ सदस्यीय समितीनेही निःपक्ष पणे तपास करुन संपूर्ण चौकशी करावी, अशी मागणीही चव्हाण यांनी यावेळी केली.

मोठी बातमी: भाजपच्या संसदीय मंडळातुन नितीन गडकरी, शिवराजसिंह चौहान बाहेर, येडियुरप्पा यांची एन्ट्री

Back to top button