यूपीची राणी म्हणवत ज्योतिरादित्य शिंदेंच्या राजवाड्यात ‘त्या’ महिलेचा गोंधळ, सुरक्षा कर्मचाऱ्यांवर केला हल्ला | पुढारी

यूपीची राणी म्हणवत ज्योतिरादित्य शिंदेंच्या राजवाड्यात ‘त्या’ महिलेचा गोंधळ, सुरक्षा कर्मचाऱ्यांवर केला हल्ला

पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या जय विलास पॅलेसमध्ये एका महिलेने प्रचंड गोंधळ घातला. ही महिला उत्तर प्रदेशातील ग्वाल्हेर येथील जयविलास पॅलेसला भेट देण्यासाठी आली होती आणि स्वत:ला राणी म्हणवून घेत होती. राजवाड्याच्या रक्षकांनी तिला तिथून जाण्यास सांगितले तेव्हा ती सुरक्षा कर्मचार्‍यांवर भडकली. तसेच शिवीगाळ करून मारहाण करण्याचाही तिने प्रयत्न केला. या प्रकाराबद्दल सुरक्षा कर्मचार्‍यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि महिलेवर गुन्हा दाखल करून तिला ताब्यात घेतले.

या प्रकाराबद्दल मिळालेली अधिक माहिती अशी की, उत्तर प्रदेशातील प्रियंका श्रीवास्तव ही महिला ग्वाल्हेरमध्ये शिंदे राजघराण्याच्या जय विलास पॅलेसला भेट देण्यासाठी आली होती. ही महिला विना तिकीट वाड्यात घुसली तेव्हा सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तिला अडवले. सुरक्षा कर्मचार्‍यांनी महिलेला थांबवताच तिने स्वत:ला उत्तर प्रदेशची राणी सांगून आतमध्ये जाण्यास सुरुवात केली. आणि नंतर कर्मचाऱ्यांवरच हल्ला केला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस जय विलास पॅलेसमध्ये पोहोचले. त्यांनी गोंधळ घालणा-या महिलेला ताब्यात घेतले. एसएसपी मृखंडी देगा यांनी सांगितले की, महिलेवर गुन्हा दाखल केल्यानंतर तिला ताब्यात घेण्यात आले आहे. महिला उत्तर प्रदेशची रहिवासी आहे. तिची चौकशी सुरू आहे.

Back to top button