सोलापूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५ च्या आकारातील मानवी साखळीत अक्कलकोटमध्ये राष्ट्रगीत गायन | पुढारी

सोलापूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५ च्या आकारातील मानवी साखळीत अक्कलकोटमध्ये राष्ट्रगीत गायन

सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट पंचायत समिती येथे स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झा‍ल्यानिमित्त ७५ च्या आकारात मानवी साखळी करून राष्ट्रगीत गायन करण्यात आले. गटविकास अधिकारी सचिन खुडे, महिला बाल विकास अधिकारी सुवर्णा जाधव व कर्मचारी उपस्थित होते.

सर्व ११ तालुक्यात पंचायत समिती व सराव ग्रामपंचायतीमध्ये या समूह राष्ट्रगीत कार्यक्रमाची आयोजन करण्यात आले होते. सर्व अंगणवाड्या, उमेदचे जवळपास १५ हजारांपेक्षा अधिक बचत गटातील महिला यामघ्ये सहभागी झाल्या होत्या. पंढरपूर तालुक्यांतील भोसे येथे शिस्तबध्दरित्या विद्यार्थ्यांनी संचलन करून ग्रामस्थांनी राष्ट्रगीत गायन केले.

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील ज्वाजल्य पराक्रमाचा इतिहासाचे स्मरण या निमित्ताने करण्यात आले. ‘आझादी का अमृत महोत्सव’अंतर्गत स्वराज्य महोत्सव चांगल्या उपक्रमाचे जिल्हयात आयोजन करण्यात आले होते. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

हेही वाचा

Back to top button