सर्दीने त्रस्त आहात? आजीबाईच्या बटव्यातील ‘हा’ उपाय करा, दोन दिवसात सर्दी होईल गायब!

सर्दीने त्रस्त आहात? आजीबाईच्या बटव्यातील ‘हा’ उपाय करा, दोन दिवसात सर्दी होईल गायब!

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्या पावसाळा सुरू आहे. नदी-नाले तुडूंब भरून वाहत आहे. या दिवसात वातावरणात होणा-या बदलामुळे किंवा पावसात भिजल्याने अनेकांना सर्दीचा त्रास होतो. अनेकदा सर्दी झाल्यानंतर औषधोपचार घेतले तरी कमीत-कमी आठ दिवस आणि जास्तीत जास्त 15 दिवस सर्दीचा त्रास होतो. मुळात सर्दीसारख्या आजारावर आपल्याकडे अनेक छोटे-छोटे अतिशय साधे कमी खर्चाचे आणि कोणताही अन्य साइड इफेक्ट नसलेले उपाय आहेत. मात्र, या औषधांबाबत आपण विसरत चाललो आहोत. असेच एक औषध जे सर्दीवर रामबाण उपाय ठरते आणि ते अगदी कमी खर्चात तुम्ही घरच्या-घरी किंवा कुठेही करू शकता. आजीबाईच्या बटव्यातील या औषधाचे नाव आहे 'आसमनतारा'…

सर्दी कमी न झाल्यास छातीत कफ होणे, कान-घसा डोकेदुखी यासारखे आजार जडतात. काही जण सर्दी बंद होण्याच्या गोळ्या खातात. मात्र, याने तात्पुरत्या स्वरुपाचा आराम पडतो. काही दिवसांनी पुन्हा सर्दीचा त्रास जा‍णवतो. तसेच सर्दी बंद होण्यासाठी ज्या गोळ्या घेतल्या जातात त्यामुळे अनेकांना अतिरिक्त झोप येते. या गोळ्यांमुळे आळसवल्यासारखे सुद्धा होते.

सर्दी कमी करण्यासाठी विक्स, बाम, किंवा यासारख्या टॅबलेटची वाफ घेणे हा देखील उपाय अनेक जण करतात.  तर काही जण सर्दीसाठी सतत इन्हेलरचा उपयोग करत राहतात. इन्हेलरचा जास्तीचा वापर ही नंतर सवय जडते. तसेच त्याचा नशा होण्याची देखील भीती असते. असेच एक औषध जे सर्दीवर रामबाण उपाय ठरते आणि ते अगदी कमी खर्चात तुम्ही घरच्या-घरी किंवा कुठेही करू शकता. आजीबाईच्या बटव्यातील या औषधाचे नाव आहे 'आसमनतारा'…

नाव थोडे विचित्र आहे पण याचे लोकल भाषेतील नाव हेच. तसे याला मेडिकल भाषेत मेन्थॉल सुद्धा म्हणतात. काचेसारखा दिसणारा हा पदार्थ शक्यतो तुम्हाला एखाद्या पानाच्या दुकानात किंवा काही जुन्या प्रकारची सामग्री मिळणाऱ्या दुकानात मिळ‍‍ू शकतो. काही मेडिकलमध्ये देखिल मेन्थॉलच्या स्वरुपात ते मिळते. पण पानाच्या दुकानात तुम्हाला हे हमखास भेटते. कारण पान बनवताना याचा उपयोग केला जातो. वेगवेगळ्या भागानुसार याचे पॅकेजिंग थोडे वेगवेगळे येते. त्यामुळे किंमतीत थोडा फार फरक आढळतो. साधारण 15 रुपये ते 35 रुपयापर्यंत वेगवेगळ्या आकारात ही बाटली येते.

कसा वापरतात 'आसमनतारा'

हे वापरणे खूप सोपे आहे. बाटलीतील आसमनतारा पांढ-या कांड्यांच्या स्वरुपात असतो. त्या ब-याच वेळा एकमेकांना चिकटतात. त्यातील एक छोटी कांडी तोडून चमच्यावर घ्या. तुम्हाला पाहिजे तितके औषध काढल्यानंतर बाटली लगेच बंद करा. कारण तो उघडा ठेवल्यास कापुराप्रमाणे उडून जातो. चमच्यावर काढलेले औषध गॅसवर थोडे गरम करा. त्यातून वाफ निघते. ही वाफ डोळे बंद करून नाकाने ओढा. वाफ डोळ्यात जाऊ देऊ नका. दोन मिनिट तुम्हाला नाक आणि डोक्यात चुरचुरेल; पण एका झटक्यात तुमची सर्दी मोकळी होईल. नंतर नाकातून थोडा वेळ पानी येऊ शकते. हा उपाय तुम्ही दिवसातून कमीत-कमी ५ ते ६ वेळा घ्या. रात्री झोपण्यापूर्वी वाफ घेऊन झोपले तर खूपच लवकर फरक पडतो.

सर्दीमुळे घसा दुखत असेल तर हा आसमनतारा को-या चहात घालून घ्या. त्यामुळे घसा दुखणे देखील बंद होते. चहा प्यायला आवडत नसेल तर तुम्ही दुधात घालून देखील घेऊ शकता.

तुम्हाला जर सतत सर्दी-पडसे होत असेल आणि तुम्ही नियमित आसमान ता-याची वाफ दिवसातून किमान चार वेळा घेतली. तरी तुम्हाला नंतर-नंतर सर्दी होण्याचे प्रमाण कमी-कमी होत जाते. शिवाय इन्हेलर प्रमाणे याची सवयही लागत नाही आणि अन्य कोणतेही साइड इफेक्ट होत नाही. हे खूप पॉकेट फ्रेंडली आहे. एका वेळेला एक कांडी इतकीच मात्रा लागते. लगेचच सर्दी बंद होत असल्याने शिल्लक राहिलेली बाटली पुढच्या वेळेला उपयोगी पडते. तेव्हा आजीबाईच्या बटव्यातील हे औषध एकदा नक्कीच वापरून पाहा…

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news