सोलापूर : पंजाब बँकेची ९२ लाखांची फसवणुक; पिता-पुत्राविरूद्ध गुन्हा दाखल | पुढारी

सोलापूर : पंजाब बँकेची ९२ लाखांची फसवणुक; पिता-पुत्राविरूद्ध गुन्हा दाखल

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा

विविध कारणांसाठी पंजाब नॅशनल बँकेकडून कर्ज घेऊन रक्कम परतफेड न करत ९२ लाख ५८ हजार ९२१ रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पिता – पुत्राविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी मंजुनाथ शिवाराम कलकुर (वय- ५०, रा. रुद्राक्ष आल्ले, नगर वसंत विहार, सोलापूर) या शाखा मॅनेजरने सदर बाजार पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून शावरप्पा यशवंत पाटील व दीपक शावरप्पा पाटील (रा. पाटील नगर, सैफुल विजापूर रोड, सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, हाऊसिंग लोन, सीसी लोन, टर्म लोन यासाठी विविध रक्कमेनुसार बँकेतून लोन मंजूर करून घेऊन त्याची परतफेड न करता थकित व्याजासह ९२ लाख ५८ हजार ९१२ रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शावरप्पा पाटील यांनी ३२२ स्वेअर मिटर ही जागा बँकेची परवानगी न घेता परस्पर आश्विनी शामराव भोसले (दुय्यम निबंधक वर्ग २, उत्तर १ सोलापूर) यांच्या कार्यालयात त्यांनी खरेदी दस्ताने विक्री केली आहे. असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील हे करीत आहेत.

हेही वाचा :

 

Back to top button