सोलापूर मनपा निवडणूक : महिलांसाठी ५७ प्रभाग आरक्षित | पुढारी

सोलापूर मनपा निवडणूक : महिलांसाठी ५७ प्रभाग आरक्षित

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा

शहराचे लक्ष लागलेल्या महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी आज (दि.३१) महिला आरक्षणाची सोडत काढण्यात आली. याअंतर्गत सर्वसाधारण महिलांसाठी 48, अनुसूचित जातीसाठी 8 तर अनुसूचित जमातीसाठी 1 जागा आरक्षित असणार आहे. दमाणी अंध शाळेचे दिव्यांग विद्यार्थी दर्शना लेंडवे, कार्तिकी खांडेकर, अस्मिता बनसोडे, संकेत रुपनुरे यांच्या हस्ते ही सोडत काढण्यात आली.

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, महापालिका प्रशासनाच्यावतीने छत्रपती रंगभवन येथे दुपारी एक वाजता महिला आरक्षणाची सोडत काढण्यात आली. यावेळी मनपा आयुक्त पी. शिवशंकर, अतिरिक्‍त आयुक्त विजय खोराटे, सहाय्यक आयुक्त विक्रमसिंह पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी अनूसूचित जाती,अनुसूचित जमाती व सर्वसाधारण अशा तीन प्रकारच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली.

असे असणार आरक्षण

113 सदस्यसंख्या असलेल्या सोलापूर महापालिकेत एकूण 57 जागा महिलांसाठी राखीव आहेत. यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व सर्वसाधारण असे तीन प्रकारचे आरक्षण आहे. अनुसूचित जातीच्या महिलांसाठी प्रभाग क्र. 5अ, 9अ, 10 अ, 23 अ, 24 अ, 28अ, 33 अ, 36 अ या 8 जागा तर अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी 35 अ ही एकच जागा राखीव असणार आहेत. सर्वसाधारण महिलांसाठी 48 जागा राखीव राहणार असून, यामध्ये प्रभाग क्र., 1ब, 2अ, 2 ब, 3 अ,4 अ, 4 ब, 5 ब, 6 अ, 6 ब, 7 ब, 8 ब, 9 ब, 10 ब, 11 अ, 12 अ, 13 अ, 13 ब, 14 अ, 14 ब, 15 अ, 15 ब, 16 अ, 17 अ, 17 ब, 18 अ, 19 अ, 19 ब, 20 अ, 21 ब, 22 ब, 23 ब, 25 अ, 25 ब, 26 ब, 27 ब, 28 ब, 29 अ, 30 अ , 31 अ, 31 ब, 32 अ, 32 ब, 33 ब, 34 अ, 35 ब, 36 ब, 37 अ, 38 ब चा समावेश आहे.

हेही वाचा :

Back to top button