सोलापूर : पंढरपूर-आटपाडी महामार्गावर भीषण अपघातात २ जागीच ठार | पुढारी

सोलापूर : पंढरपूर-आटपाडी महामार्गावर भीषण अपघातात २ जागीच ठार

सांगोला (सोलापूर) : पुढारी वृत्तसेवा : पंढरपूर – आटपाडी या राज्य मार्गावरील कटफळ या ठिकाणी डंपर व मोटर सायकल यांची समोरासमोर धडक झाली. यामध्ये सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील वरकुटे मलवडी या गावातील दोन युवकांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.22) दुपारी साडेतीन वाजता घडली.

याबद्दलची अधिक माहिती अशी की, वरकुटे मलवडी गावचे दोन युवक मित्राच्या लग्नासाठी आटपाडी तालुक्यातील दिघंची येथे आले होते. लग्न आटोपून ते दोघे सांगोल्याला जात असताना दुपारी साडेतीनच्या सुमारास कटफळ येथे डंपर व मोटरसायकलची जाेरदार धडक झाली. या अपघातात सुशांत शांताराम जाधव व मंगेश शिवाजी पिसे हे दोन्ही युवक जागीच ठार झाले. सदर अपघाताची माहिती मिळताच कटफळ आऊट पोस्टचे पोलीस कर्मचारी घटनास्‍थळी दाखल झाले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा  

Back to top button