सोलापूर : मोहोळ-पंढरपूर महामार्गावर भीषण अपघातात डाॅक्‍टर दाम्‍पत्‍यासह ६ ठार | पुढारी

सोलापूर : मोहोळ-पंढरपूर महामार्गावर भीषण अपघातात डाॅक्‍टर दाम्‍पत्‍यासह ६ ठार

पेनुर (सोलापूर), पुढारी वृत्‍तसेवा : मोहोळ- पंढरपूर महामार्गावर पेनुर गावाजवळ आज (दि. 22) भीषण अपघात झाला. या अपघातात डाॅक्‍टर दाम्‍पत्‍यासह सहा जण जागीच ठार झाले. सर्व मृत हे मोहोळ शहरातील आहेत. दरम्‍यान, अपघातातील जखमींना उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, पंढरपूर – मोहोळ महामार्गावर दोन वाहनांची समोरासमोर धडक झाली. ही धडक एवढी भीषण हाेती की, सहाजण जागीच ठार झाले. या अपघातामध्ये मोहोळ शहरातील डॉक्टर पती-पत्नी, मेव्हणे व त्यांची पत्नी तसेच त्यांच्यासह 2 मुलांचा जागीच मृत्यू झाला आहे. डॉ. आफरिन अत्तार, डॉ. मुजाहिद अत्तार, मेव्हणे इरफान खान, त्यांची पत्नी व त्यात दोन मुलं  असे ६ जण जागीच ठार झाले आहेत. चारपदरी रस्ता झालेला असताना समोरासमोर अपघात कसा झाला, याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे.

डॉ.अत्तार हे पंढरपूरहून मोहोळकडे निघाले होते, तर कारमधील प्रवासी सोलापुरातून लग्न आटपून पंढरपूर येथील गादेगावकडे निघाले होते. कारमधील राजेंद्र हुंडेकरी, रामचंद्र शेटे, मंदाकिनी शेटे यांच्‍यासह सहा जण जखमी झाले असून, त्यांना पंढरपूर येथे उपचारासाठी दाखल केले आहे.

हेही वाचा  

Back to top button