परभणी : विहिरीत उडी घेऊन तरुणाची आत्महत्या | पुढारी

परभणी : विहिरीत उडी घेऊन तरुणाची आत्महत्या

बोरी ; पुढारी वृत्तसेवा : जिंतूर तालुक्यातील बोरी येथील म्हाडाजवळील विहिरीत उडी घेऊन तरुणाने  आत्महत्या (suicide in parbhani) केली. ही घटना रविवारी (दि.२२) दुपारी घडली. विष्णू उर्फ रामा रमेश घोरपडे (वय २६) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बोरी येथील केशव नगरातील रहिवासी विष्णू उर्फ रामा घोरपडे हा कामानिमित्त अनेक दिवसांपासून बाहेरगावी होता. तो दोन दिवसांपूर्वी तो गावी परतला होता. आज त्यांने गावातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक वसंत मुळे, पोलीस उपनिरीक्षक अनिल खिल्लारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किसन पतंगे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.

हेही वाचलंत का ? 

Back to top button