सोलापूर : नान्नजमध्ये विहिरीत पडून महिलेचा मृत्यू | पुढारी

सोलापूर : नान्नजमध्ये विहिरीत पडून महिलेचा मृत्यू

उत्तर सोलापूर , पुढारी वृत्तसेवा : नान्नज येथील सविता संतोष कोरे (वय ३५ ) हिचा विहिरीत पडून मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी दुपारी अडीच तीनच्या सुमारास घडली. सविस्तर वृत्त असे की सविता कोरे यांच्यावर गेल्या तीन महिन्यापासून मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार सुरु होते. सविता दुपारी मुलगा झोपला होता असताना वेडाच्या भरात घरुन निघून गेली व गावाशेजारील सोलापूर-बार्शी रस्त्या जवळील देवबप्पा या विहिरीत उडी घेत आत्महत्या केली.

पती संतोष हे हॉटेलमधून घरी जेवणाला आले असता पत्नी घरात नसल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी तिचा शेतात व अन्य ठिकाणी शोध घेतला असता विहिरी जवळ सविता यांची चप्पल दिसून आली. यावरून पत्नीने विहिरीत पडून आत्महत्या केल्याचा संशय आला. गावातील नागरिक युवकाच्या मदतीने पाण्यात कॅमेरा सोडून शोधाशोध सुरू केला.

विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने महिलेला बाहेर काढण्यात अडथळा निर्माण होत होता. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास विहिरीतील पाण्यात हुकाद्वारे व पाण्यात पोहणाऱ्या युवकांच्या मदतीने विहिरीत बुडालेल्या महिलेला वर काढण्यात यश आले. पुढील उपचाराकरिता स्विहिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच उत्तर तालुका पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी बंडगर, पोलीस कॉन्स्टेबल अशोक खवतडे घटनास्थळी दाखल झाले होते.

हेही वाचलतं का?

Back to top button