(BJP-NCP) Parbhani : जिंतुरमध्ये भाजप-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये राडा

(BJP-NCP) Parbhani : जिंतुरमध्ये भाजप-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये राडा

जिंतुर, पुढारी वृत्तसेवा  : शहरातील जिल्हा परिषद शाळेत जिंतुर तालुका ओद्योगिक वसाहत सहकारी संस्थेच्या निवडणुकीसाठी आज (दि. २७) मतदान होते. यावेळी भाजप आणि राष्ट्रवादीचे (BJP-NCP) गट आमने-सामने आले. दोन्ही गटात तुफान राडा होऊन हाणामारी झाली. त्यामुळे या निवडणुकीला निकालाआधीच गालबोट लागले.

अधिक माहिती अशी की, जिंतुर तालुका औद्योगिक वसाहत सहकारी संस्थेच्या संचालक पदासाठी मतदान होणाऱ्या केंद्रावर दोन्ही राजकीय गटाच्या प्रमुखांनी (BJP-NCP) आपापल्या कार्यकर्त्यांसह उपस्थिती लावली होती. १० जागांसाठी आज मतदान प्रकिया सुरु होती. यासाठी १७ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तसेच अनुसुचित जाती अनुसुचित जमाती या दोन जागेसाठी उमेदवारच उपलब्ध नसल्याने सदर जागा रिक्त आहेत. यापूर्वी बोर्डिकर गटाची एका जागे साठी बिनविरोध निवड झालेली आहे. या निवडणुकीसाठी कट्टर प्रतिस्पर्धी बोर्डिकर व भाबळे यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

या निवडणूक दरम्यान माजी आमदार रामप्रसाद बोर्डिकर व माजी आमदार विजय भांबळे कार्यकर्त्यांसह (BJP-NCP) उपस्थित होते. यावेळी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली.  रामप्रसाद बोर्डिकर व विजय भाबळे समोरासमोर आल्याने मोठा गदारोळ उडाला. याच दरम्यान दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. त्यामुळे काहीकाळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. सर्वत्र धावपळ सुरु होताच परिसरातील पान टपऱ्या व  हॉटेल बंद करण्यात आली. तणावाची परिस्थिती पाहता अतिरिक्त पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन हे एसआरपीच्या तुकडीसह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. बामनी, चारठाणा व बोरी येथून जादा पोलिसांची कुमक बोलविण्यात आली.

पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत सौम्य लाठीचार्ज केला. व अश्रुधुराच्या नळकांडया फोडत तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली. या वेळी पोलीस निरीक्षक दीपक शिंदे आपल्या फ़ौजफाटयासह परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होते. अनियंत्रित जमावास पांगवताना तुफान दगडफेकीत एपीआय गंगाधर गायकवाड़ व पोलीस कर्मचारी बालकृष्ण कांबळे हे दोघे जखमी झाले. एपीआय गायकवाड यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.(BJP-NCP)

दरम्यान, बेकायदेशीर लोक जमवून राष्ट्रवादीने दहशत माजवल्याच आरोप आमदार मेघना बोर्डिकर यांनी केला आहे. ज्यांना मतदानाचा अधिकार नसताना शहरी व ग्रामीण भागातील लोकांना जमवून मतदारावर अप्रत्यक्ष दबाव टाकण्याचा प्रकार माजी आमदार विजय भांबळे व त्यांच्या कार्यकृत्यांनी केल्याचा आरोप आमदार मेघना बोर्डिकर यांनी केला. मतदार हा सुशिक्षित आहे. खरी परिस्थिती त्यांच्या लक्षात आलेली आहे. पराजय पाहता विरोधकांच्या पायाखालील वाळू सरकत असल्याचे बोर्डीकर यांनी म्हटले आहे. (BJP-NCP)

आम्ही लोकशाही मार्गाने मतदान करण्यासाठी येथे आलो असताना माजी आमदार रामप्रसाद बोर्डिकरांनी व त्यांच्या कार्यकृर्त्यांनी प्रचंड दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता.परिस्थिती चिघळवन्याचा प्रयत्न करत मारहाण सुद्धा केली. अशा प्रकारे लोकशाहीचा गळा कोणी घोटत असेल, तर ते आम्ही सहन करणार नाही. अशा कोणत्याही दहशतीला आम्ही घाबरणार नाही, असे माजी आमदार विजय भांबळे यांनी म्हटले आहे.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news