सोलापूर: पुढारी वृत्तसेवा सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी प्रारुप प्रभाग रचना मंगळवारी सकाळी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी महानगरपालिकेच्या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने जाहीर केली. प्रभाग रचना जाहीर होताच 'कहीं खुशी, कहीं गम' परिस्थिती निर्माण झाली आहे. भौगोलिकद़ृष्ट्या अनेक प्रभागांची तोडफोड करून रचना करण्यात आली आहे. त्यामुळे यांच्यासाठी हा प्रभाग लाभकारक, तर यांना बसणार फटका अशा चर्चेला उधाण आले आहे. प्रभाग रचनेचा आराखडा जाहीर झाल्याने विद्यमान दिग्गज नगरसेवक आणि इच्छुकांच्या मोर्चेबांधणीला आता खर्या अर्थाने वेग येणार आहे. या प्रभाग रचनेवर 14 फेबु्रवारीपर्यंत हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. या हरकतींवर 26 फेब्रुवारीपर्यंत सुनावणी होणार आहे.
मंगळवारी 1 फेब्रुवारी रोजी आयुक्त पी. शिवशंकर यांनी हा प्रारुप प्रभाग आराखडा महापालिकेच्या वेबसाईटवर तसेच महापालिका कौन्सिल हॉल आवारात फलकावर लावला आहे. महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी सोलापूर महापालिकेच्या वेबसाईटवर मंगळवारी सकाळी अकरा वाजता प्रारुप प्रभाग रचना जाहीर केली. यामध्ये ऑनलाईन नकाशा व सविस्तर प्रभागरचना नमूद आहे. तसेच कौन्सिल हॉल आवारातील फलकावरही हा आराखडा लावण्यात आला होता.
दरम्यान, प्रारूप रचना पाहण्यासाठी महापालिका आवारात राजकीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते व इच्छुकांची मोठी गर्दी झाली होती. अनेकजण आपल्या मोबाईलवर ऑनलाईन प्रभाग रचना वाचून चर्चा करत असल्याचे दिसून आले. जुना प्रभाग फोडून त्यातील हा भाग नव्या या प्रभागाला जोडला आहे, अनेक प्रभाग नव्याने निर्माण केले आहेत, यांच्यासाठी हा प्रभाग सोयीस्कर आहे, तर यांना या रचनेचा फटका बसला आहे, अनेक जुन्या प्रभागांची रचना ही तोडफोड करण्यात आली आहे, अशा चर्चा महापालिका आवारात रंगल्या होत्या.
या प्रारूप प्रभाग रचनेमुळे काही इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्याचेही यावेळी पालिका आवारात पाहावयास मिळाले, तर काही विद्यमान नगरसेवकांना धक्कादायक अशी प्रभाग रचना ठरणार असल्याने नगरसेवकांमधून नाराजीचा सूर उमटले आहेत. राष्ट्रवादी आणि काँग्रेसने यात काहीसा हस्तक्षेप केल्याचा आरोप होत आहे. काही जणांना सोयीची रचना केली आहे. त्यामुळे ही प्रभाग रचना कुणाला अनुकूल आणि कुणाला प्रतिकूल असेल याची चर्चा महापालिका आवारात रंगली.
सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी प्रारुप प्रभाग रचना मंगळवारी सकाळी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी महानगरपालिकेच्या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने जाहीर केली. प्रभाग रचना जाहीर होताच 'कहीं खुशी, कहीं गम' परिस्थिती निर्माण झाली आहे. भौगोलिकद़ृष्ट्या अनेक प्रभागांची तोडफोड करून रचना करण्यात आली आहे. त्यामुळे यांच्यासाठी हा प्रभाग लाभकारक, तर यांना बसणार फटका अशा चर्चेला उधाण आले आहे.
हेही वाचलतं का?