बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी आज मुंबईत बैठक | पुढारी

बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी आज मुंबईत बैठक

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील बुधवारी (दि. 2) मुंबईत अधिकार्‍यांची बैठक घेणार आहेत. त्यांनीच ही माहिती महाराष्ट्र एकीकरण समिती नेत्यांना दिली. मंत्री पाटील मंगळवारी बेळगावात आले होते. उद्योजक अरविंद गोगटे यांच्या निधनामुळे त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. त्यानंतर समिती नेत्यांनी त्यांची भेट घेतली. समिती नेत्यांनी सीमाप्रश्नी सुनावणी लवकर व्हावी. वकिलांची रिक्त पदे भरण्यात यावीत.

सीमाकक्षातीलअधिकार्‍यांच्या समस्या सोडवाव्यात; साक्षी, पुरावे तपासणीसाठी प्रयत्न करावेत आणि वरिष्ठ वकिलांची बैठक घ्यावी, अशी विनंती केली. त्यानुसार जयंत पाटील यांनी बुधवारी मुंबईत सीमा कक्षातील अधिकार्‍यांची बैठक आयोजित केली आहे. मध्यवर्ती समिती अध्यक्ष दीपक दळवी, खजिनदार प्रकाश मरगाळे, सरचिटणीस मालोजी अष्टेकर उपस्थित होते.

वकील नियुक्ती, सुनावणीबाबत चर्चा

कर्नाटकाकडे मागणी करा
केरळच्या सीमाभागातील कन्नड लोकांसाठी कर्नाटकाने मागणी करून भाषिक अधिकार मिळवून दिले आहेत. तशाच प्रकारची मागणी महाराष्ट्राने कर्नाटकाकडे करावी, असे समिती नेत्यांनी मंत्री जयंत पाटील यांना सांगितले. तसेच केरळ सरकारने कर्नाटक सरकारला पाठवलेल्या पत्राची प्रतही नेत्यांनी मंत्री पाटील यांना दिली.

हेही वाचलतं का?

Back to top button