सातारा : ‘प्रतापगड’ कारखान्यावर संस्थापक पॅनेलचे वर्चस्व

सातारा : ‘प्रतापगड’ कारखान्यावर संस्थापक पॅनेलचे वर्चस्व

सातारा  : पुढारी वृत्तसेवा
जावली तालुक्यातील प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत सौरभ शिंदे गटाच्या संस्थापक सहकार पॅनेलने सर्वच्या सर्व 21 जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळवले. दीपक पवार यांच्या गटाचा दारुण पराभव झाला. संस्थापक सहकार पॅनेलचे सर्व उमेदवार सुमारे 1200 च्या मताधिक्क्याने विजयी झाले आहेत. यापूर्वी 3 जागा बिनविरोध झाल्या आहेत. सोमवारी सकाळपासून सभासद मतदार व कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर गर्दी केली होती. मेढा येथील बाबासाहेब शिंदे आखाडकर सभागृहात मतमोजणी करण्यात आली. यामध्ये संस्थापक सहकार पॅनेलचे सर्व 18 उमेदवार मताधिक्क्याने विजयी झाले.

या निवडणुकीतील विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते याप्रमाणे- शिंदे राजेंद्र रामचंद्र (2221), शिंदे सौरभ राजेंद्र (2179), शिंदे सुनेत्रा राजेंद्र (2135), मोहिते आनंदराव सदाशिव (2121), पवार शांताराम रामराव (2117), शिवणकर अंकुश यादवराव (2105), पार्टे रामदास निवृत्ती (2130), शिंदे आनंदराव मानसिंग (2147), तरडे प्रदीप मारुती (2122), जुनघरे आनंदराव हरीबा (2144), मर्ढेकर शिवाजी साहेबराव (2115), निकम बाळासो गणपत (2118), पार्टे गणपत रामचंद्र (2110), सावंत जयवंत उर्फ नानासाहेब जनार्दन (2066), वांगडे दिलीप यशवंत (2069), निकम बाळकृष्ण लक्ष्मण (2213), गोसावी कुसूम लक्ष्मणगिरी (2177), शेवते विजय महादेव (2202). बारटक्के शोभाताई प्रमोद, पोफळे ताराबाई ज्ञानेश्वर, मोरे विठ्ठल विष्णू यांची अगोदरच बिनविरोध निवड झाली. दिपक पवारांच्या बचाव पॅनेलला 1 हजार मतांचा टप्पाही ओलांडता आला नाही.

हेही वाचलत का ?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news