फायबर प्लास्टिक मिश्रित तांदूळ खाल्याने चिमुरड्यास बाधा

जावळी तालुक्यातील कुडाळ  येथील अंगणवाडीस फायबर प्लॅस्टिक मिश्रित तांदूळ पुरवठा करण्‍यात आल्‍याचे ग्रामस्‍थांच्‍या निदर्शनास आले.
जावळी तालुक्यातील कुडाळ येथील अंगणवाडीस फायबर प्लॅस्टिक मिश्रित तांदूळ पुरवठा करण्‍यात आल्‍याचे ग्रामस्‍थांच्‍या निदर्शनास आले.

कुडाळ ; पुढारी वृत्तसेवा :  जावळी तालुक्यातील कुडाळ येथील अंगणवाडीमध्ये फायबर प्लॅस्टिक मिश्रित तांदूळ खाल्ल्याने चिमुरड्यास बाधा झाली आहे. दोन दिवसांपूर्वीच्‍या या घटनेमुळे एकच खळबळ माजली आहे. माजी सरपंच आणि ग्रामस्थांनी अंगणवाडीस फायबर प्लास्टिक मिश्रित तांदूळ  पुरवठा करण्‍यात आल्‍याच्‍या प्रकाराचा पर्दाफाश  केला आहे.

या संदर्भात दैनिक पुढारीने स्टिंग ऑपरेशन करून एकात्मिक बाल विकास प्रकल्प योजनेअंतर्गत अंगणवाडी मुले व गरोदर माता महिलांना पुरवल्या जाणाऱ्या निकृष्‍ट अन्नधान्य पुरवठा काळाबाजार उघडकीस आणला आहे. या बाबत संबंधित पुरवठा ठेकेदारावर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

कुडाळ अंगणवाडीस पुरवल्या गेलेल्या अन्नधान्य पुरवठामध्ये निकृष्ट दर्जाचे फायबर प्लास्टिक मिश्रित तांदूळ व डाळ मीठ मिरची पूड त्याचबरोबर इतर साहित्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्‍याचे ग्रामस्थांना निदर्शनास आले.

दोन दिवसांपूर्वीच पुरवठा झालेल्या इंदिरानगर येथील एका कुटुंबातील मुलाने तांदूळ व डाळ खाल्ल्याने त्याला बाधा झाला.

याबाबत संबंधित अंगणवाडी सेविका व पुरवठा प्रकल्प अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र अद्यापही याबाबत ठोस उपाययोजना न झाल्याने हा प्रकार अंगणवाडी सेविका यांनी माजी उपसरपंच वीरेंद्र शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिला.

संपूर्ण पुरवठा झालेला धान्य वस्तू तपासल्यानंतर सर्वच वस्तू निकृष्ट दर्जाच्या असल्याचे निदर्शनास आले.

लहान मुलांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार संबंधित विभाग व ठेकेदार करत असल्याचा आरोप  ग्रामस्‍थांकडून हाेत आहे.

या प्रकरणी वरिष्ठांनी कठोर पावले उचलत संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

हेही वाचलं का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news