सातारा : नागठाणे येथून उरमोडी नदीतून तरुण वाहून गेला

सातारा : नागठाणे येथून उरमोडी नदीतून तरुण वाहून गेला

नागठाणे: पुढारी वृत्तसेवा : नागठाणे (ता. सातारा) येथून उरमोडी नदीपात्रातून एक युवक वाहून गेला. मनोज सुधाकर गडकरी (वय २८) असे वाहून गेलेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच बोरगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक चेतन मचले घटनास्थळी दाखल झाले.

रविवारीपासून बोरगाव पोलिसांनी शोधमोहीम राबवली आहे. तरीपण युवकाचा शोध लागू शकला नाही. या घटनेची फिर्याद अजून बोरगाव पोलिसांत दाखल झाली नाही. पोलीस संबंधित युवकाचा नदीपात्रात शोध घेत आहेत.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news