cryptocurrency : क्रिप्टोकरन्सी वधारली; गुंतवणुकदारांची चांदी

cryptocurrencies
cryptocurrencies
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : जगभरातील क्रिप्टोकरन्सी (cryptocurrency) आज पुन्हा तेजीत आलेल्या आहेत. मोठ्या प्रमाणावर खरेदी झाल्याने क्रिप्टोकरन्सीचे जागतिक पातळीवरील एकूण मुल्य १ ट्रिलियनच्या वर गेलेले आहे. आज एका बिटकॉईनची किंमत २२, २०० डॉलर इतकी झालेली आहे. बिटकॉईनमध्ये झालेली वाढ ३.१२ टक्के इतकी आहे. (cryptocurrency)

जागतिक क्रिप्टो मार्केटचे जागतिक मूल्य १.०१ ट्रिलियन डॉलर इतके पोहोचले आहे. ही वाढ ३.४% इतकी आहे. एकूण व्यवहाराचा विचार केला तर क्रिप्टोत ६९.३१ अब्ज डॉलरचे व्यवहार झाले आहेत. व्यवहारातील ही वाढ ६.८७टक्के इतकी आहे.

एकूण क्रिप्टोच्या मार्केटमध्ये बिटकॉईनचा वाटा आता ४२४.३ अब्ज डॉलर इतके झाले आहे.

गेल्या चोवीस तासात सर्वाधिक वधारलेल्या काही क्रिप्टोकरन्सींची यादी पुढील प्रमाणे : लूपरिंग (१५%), पॉलिगॉन (१४ टक्के), थोरचेन (१०.५टक्के), अॅपेकॉईन (१० टक्के), इथेरियम (६.३९ टक्के)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news