

कराड: पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्ल्हातील कोपर्डे हवेली येथे वडिलांना लाकडाने मारहाण करून मुलाने खून केला. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाटही लावली. ही घटना मंगळवारी रात्री दीडच्या सुमारास घडली. पोलिसांनी मुलाला अटक केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तानाजी लक्ष्मण होवाळ (वय 65, रा. कोपर्डे हवेली, ता. कराड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर अभिजीत तानाजी होवाळ असे मुलाचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तानाजी होवाळ पत्नी, मुलगी, व मुलगा यांच्यासह कोपर्डे हवेली येथे राहत होता. त्याला दारूचे व्यसन होते. सोमवार दिनांक 17 रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अभिजीत हा त्यांच्या घराच्या बाहेरील बाजूस उभा राहून कोणालातरी फोन वरून वडीलांना मी मारले आहे आणि आता मी मुंबईला जात आहे, असे बोलत होता. हे त्याचे बोलणे एका इसमाने ऐकले.
दरम्यान, इसमाने याबाबत माहिती दिल्यानंतर हे खरे आहे का पाहण्यासाठी लोक गेले तर त्यावेळी लक्ष्मण होवाळ मयत झाल्याचे व त्यांच्या अंगावर चादर टाकल्याचे समोर आले. त्या चादरीवरती प्रमाणात रक्ताचे डाग पडलेले होते. मुलाबाबत इसमाने कराड तालुका पोलिसांना माहिती दिली. माहितीवरून पोलिसांनी मुलाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने वडीलांना मारल्याचे कबूल केली. कबुनीनंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
.हेही वाचा