सातारा: सिंगल बोअर बंदुकीने भेकर, चौसिंगाची शिकार; तिघांना अटक

सातारा
सातारा

परळी (सातारा), पुढारी वृत्तसेवा : ठोसेघर येथे भेकर व चौशिंगाची शिकार केल्याप्रकरणी तिघांना वनविभागाने अटक केली आहे. नारायण सिताराम बेडेकर, विठ्ठल किसन बेडेकर, व युवराज निमन अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत वनविभागाने दिलेल्‍या माहितीनुसार, माची पेठ येथे असलेल्या श्री वास्तू अपार्टमेंट मध्ये असलेल्या सदनिकामध्ये रहात असलेल्या युवराज निमन यांच्या घरावर छापा मारले. यावेळी भेकर व चौसिंगा या दोन वन्यजीव प्राणी यांचे मुंडके व भेकराचे ताजे मटण व पायाचे खुर सापडले. त्याने सदर शिकार ही ठोसेघर येथील नारायण सिताराम बेडेकर, विठ्ठल किसन बेडेकर यांनी मिळून शिकार केले. नारायण यांच्याकडे असलेल्या सिंगल बोअर बंदुकीने सकाळी साधारण 7.30 वाजता भेकर याची शिकार बंदुकीने केली.

सदर मटण हे सातारामध्ये कोणा बड्या हस्तीला देण्यासाठी लपवून ठेवले होते. तसेच ते मटण रात्री घेऊन जाणार होता, असे नारायण यांनी सांगितले. सदर तीन आरोपीना वन विभागाने शिताफीने सातारा व ठोसेघर येथे अटक केली. सर्व मुद्देमाल दोन बंदूका एक एअर गणव एक सिंगल बोअर बंदूक व जिवंत काडतुसे, भेकर सोलल्याचे चाकू, कोयता व वेगवेगळ्या ठिकाणी लपविले मटण व कातडे हे सर्व घटनास्थळी दाखविले. आरोपीना अटक करण्यात आले असून वन गुन्हा नोंद झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news