कोल्हापूर : निवडणूक समोर ठेवून विरोधकांचा बिनबुडाचा आरोप – सरपंच सविता कांबळे | पुढारी

कोल्हापूर : निवडणूक समोर ठेवून विरोधकांचा बिनबुडाचा आरोप - सरपंच सविता कांबळे

हातकणंगले : पुढारी वृतसेवा : आळते येथील नळ पाणी पुरवठा दुरुस्तीची जबाबदारी ठेकेदाराकडे आहे. तरीही ग्रामपंचायतीने दुरुस्तीमध्ये लाखो रुपये भ्रष्टाचार केला असल्याचा बिनबुडाचा आरोप विरोधक करीत आहेत. केवळ निवडणूक समोर ठेवून विरोधक अभ्यास न करता आरोप करत आहेत, अशी टीका सरपंच सविता कांबळे व उपसरपंच शितल हावळे यांनी पत्रकार परिषदेत केली. विरोधकांनी प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून व्हर्टीकल टर्बाईन मोटर व पंप सेटची किंमत दोन लाख आणि दुरुस्तीवर ग्रामपंचायतीने २४ लाख रूपये खर्च दाखवून मोठा ढपला पाडल्याचा आरोप केला होता.

या आरोपाचा समाचार घेताना सरपंच म्हणाल्या की, ग्रामपंचायतीने पाणी पुरावा योजनेचे लिखीत दरपत्रक सादर करून मोटर व पंप सेटची किंमत २८ लाख ५० हजार असल्याचे सांगितले. तसेच नळ पाणी पुरवठा दुरुस्तीचे काम ठेकेदारावरच असल्याने दुरुस्तीवर ग्रामपंचायतीने खर्च करण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे भ्रष्टाचाराचा प्रश्नच उद्भवत नाही. मात्र, विरोधक केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जनतेची फसवणूक करीत आहेत. विरोधकांनी बिनबुडाचे आरोप करताना कमीत कमी अभ्यास तरी करावा, अशी उपरोधक टीकाही त्यांनी केली.

यावेळी उपसरपंच शितल हावळे म्हणाल्या, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कोट्यवधींची विकासकामे गावात झाल्यामुळे या निवडणुकीत विरोधकांसमोर मुद्दाच उरलेला नाही. त्यामुळे त्यांचे तोल सुटल्याप्रमाणे बोलत आहेत. त्यांनी केलेले आरोप गांभीर्याने घेण्याची अजिबात गरज नाही. गावचे हित कुणामुळे झाले हे गावकरी जाणून आहेत. होऊ घातलेल्या निवडणुकीत मतपेटीतून चोख उत्तर त्यांना मिळेल. यावेळी माजी उपसरपंच सुदाम चव्हाण, फय्याज मुजावर, वर्षा हावळे, उत्तम नलवडे, विजय हुक्कीरे, जयश्री नलवडे, अमित कांबळे, श्रीधर कांबळे, आशिष भबाण, अनिल हावळे आदी उपस्थित होते.

कोणत्याही प्रश्नांना पुराव्यासहीत उत्तर देवू : अजिंक्य इंगवले

ग्रामपंचायतीचा कारभार करीत असताना गावचा विकास समोर ठेवून काम करीत आहे. परंतु काही विरोधक मात्र बिनबुडाचे आरोप करीत विकासाला खीळ घालण्याचे काम करीत आहेत. अशा मंडळींनी पुराव्यासह समोरे यावे, असे खुले आव्हान सत्ताधारी आघाडीचे नेते अजिंक्य इंगवले यांनी दिले आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button